भारतात कर बचत करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा पर्याय निवडला जातो. बहुतेक पगारदार लोक कर वाचवण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत गुंतवणूक करतात. सरकारी बचत योजनेत आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर सूटचा लाभ मिळतो.याशिवाय पीएफ खात्यावर मिळणारे व्याज वार्षिक अडीच लाख रुपयांपर्यंत करमुक्त आहे.
गुंतवणुक, कमाई आणि मॅच्युरिटीचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त राहतील याची खात्री करून पीएफला एक्झम्प्ट एक्झेम्प्ट एक्म्प्टचा दर्जा प्राप्त होतो. हे इतर कर बचत योजनांच्या तुलनेत आकर्षक आणि वेगळे आहे. पीएफमध्ये सध्या ८.१. टक्के दराने व्याज मिळत आहे. अशा परिस्थितीत पीएफ खात्यात दीर्घकाळ अधिक पैसे गुंतवून, तुम्ही चांगला निधी जमा होऊ शकतो, ज्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो.
पीएफ खातेदार कर वाचवण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकतात. पीएफमध्ये १५ वर्षांनंतर मिळणार्या रकमेवर कर आकारला जात नाही. यामध्ये वार्षिक १.५ लाख रुपये आणि किमान ५०० रुपये गुंतवणूक करू शकता. पुढील १५ वर्षे यामध्ये पैसे अडकून राहतील.
- इंटरनेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्या खात्यात प्रवेश करा.
- 'पीपीएफ खाते उघडा' हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करावी
- स्वतःसाठी खाते उघडत असाल तर "सेल्फ-खाते" पर्याय निवडा. अल्पवयीन व्यक्तीचे खाते उघडत असल्यास ‘मायनर खाते’ हा पर्याय निवडा.
- अर्जामध्ये आवश्यक असलेली माहिती भरा
- प्रत्येक आर्थिक वर्षासाठी तुम्ही खात्यात जमा करू इच्छित असलेली रक्कमेचा आकडा टाका.
- तुमच्या बचत खात्यातून ऑटो डेबिट पर्याय निवडण्यासाठी योग्य माहिती द्या.
- त्यानंतर अर्ज सबमिट करा. व्यवहार अधिकृततेसाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.
- ओटीपी टाकल्यानंतर तुमचे खाते सक्रीय होईल.
- पीएफ खात्याशी संबंधित सर्व माहिती तुमच्या मेलवर पाठवली जाईल.
- पीपीएफ अर्ज घेऊन तो व्यवस्थित भरावा.
- अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व संबंधित कागदपत्रे जोडा.
- खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुमच्या पसंतीच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जा.
- अखंड पीपीएफ खाते उघडण्याच्या अनुभवासाठी संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिस शाखेत बचत खाते असणे उचित आहे.
- बँक किंवा पोस्ट ऑफिस शाखेत प्रतिनिधीला आवश्यक कागदपत्रे दाखवावी.
१) भारतीय नागरिक: केवळ भारतीय नागरिकत्व धारण केलेल्या व्यक्ती त्यांच्या नावाने पीपीएफ खाते उघडण्यास पात्र आहेत.
२) अल्पवयीन: पालकांना अल्पवयीन व्यक्तीच्यावतीने पीपीएफ खाते उघडण्याचा अधिकार आहे.
३) परदेशी: अनिवासी भारतीय (एनआरआय) जे खाते उघडण्याच्या वेळी मूळ निवासी भारतीय नागरिक होते, ते संपूर्ण १५ वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक राखू शकतात. एनआरआय दर्जा प्राप्त केल्यानंतर त्यांना नवीन खाते सुरू करण्याची परवानगी नाही.