Mukesh Ambani : रिलायन्स ही कायम गुजरातचीच कंपनी राहील; मुकेश अंबानी यांचं वक्तव्य
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mukesh Ambani : रिलायन्स ही कायम गुजरातचीच कंपनी राहील; मुकेश अंबानी यांचं वक्तव्य

Mukesh Ambani : रिलायन्स ही कायम गुजरातचीच कंपनी राहील; मुकेश अंबानी यांचं वक्तव्य

Jan 10, 2024 02:22 PM IST

Mukesh Ambani in Vibrant Gujarat Summit : व्हायब्रंट गुजरात समीटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी केलेल्या वक्तव्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Mukesh Ambani
Mukesh Ambani (HT_PRINT)

Mukesh Ambani Praises PM Narendra Modi : ‘गुजराती असल्याचा अभिमान आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही नेहमीच गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील,' असं वक्तव्य रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

गुजरातमध्ये सध्या दहावी व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद सुरू आहे. ‘गेटवे टू द फ्युचर’ ही यंदाच्या परिषदेची थीम आहे. या परिषदेला अंबानी यांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंडभरून स्तुती केली. तसंच, गुजरातच्या वेगवान विकासाचंही कौतुक केलं. 'गुजरात हे आधुनिक भारताच्या विकासाचं प्रवेशद्वार आहे. रिलायन्सनं भारतात १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, त्यापैकी एक तृतीयांश गुंतवणूक एकट्या गुजरातमध्ये आहे. २०२४ च्या शेवटी रिलायन्स गुजरातमध्ये गिगा कारखाना सुरू करेल, अशी घोषणाही त्यांनी केली.

Interim Budget 2024 : साडेसात लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री होणार; आगामी अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता

'२०३० पर्यंत गुजरातला लागणाऱ्या एकूण उर्जेची निम्मी गरज अक्षय ऊर्जेद्वारे पूर्ण करण्याचं लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू. यासाठी आम्ही जामनगरमध्ये ५००० एकरवर धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्सचं बांधकाम सुरू केलं आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील आणि हरित उत्पादनांचं उत्पादन शक्य होईल आणि गुजरात हरित उत्पादनांचा अग्रेसर निर्यातदार होईल. आम्ही २०२४ च्या शेवटी-शेवटी हा गीगा प्रकल्प सुरू होईल. गुजरातमध्ये सर्वत्र ५जी नेटवर्क गेलं आहे. यामुळं गुजरात डिजिटल डेटा प्लॅटफॉर्म आणि एआय (AI) स्वीकारण्यात जगात आघाडीवर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुकेश अंबानी यांनी व्हायब्रंट गुजरात समिटचं कौतुक केलं. ही परिषद जागतिक पातळीवरील सर्वात प्रतिष्ठित गुंतवणूकदार परिषद म्हणून ओळखली जाऊ लागली आहे, असं ते म्हणाले. २०४७ पर्यंत गुजरात ३००० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. २०४७ पर्यंत भारताला ३५००० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असंही ते म्हणाले.

Short Selling : शॉर्ट सेलिंग म्हणजे काय? ते का आणि कसं केलं जातं? काय आहेत त्याचे नियम?

मोदी है तो मुमकिन है…

मुकेश अंबानी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'मोदी है तो मुमकिन है' अशा शब्दांत केली. 'माझे परदेशी मित्र मला 'मोदी है तो मुमकिन है' चा अर्थ विचारतात, तेव्हा मी त्यांना सांगतो की भारताचे पंतप्रधान एक व्हिजन तयार करतात आणि ते अंमलात आणतात, अशक्य ते शक्य करून दाखवतात. परदेशी लोक जेव्हा नव्या भारताचा विचार करतात, तेव्हा त्यांचं लक्ष आपोआपच नव्या गुजरातकडं जातं. हा कायापालट कसा झाला? नरेंद्र मोदी या महान नेत्यामुळं हे शक्य झालं आहे. मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत, असंही ते म्हणाले. 

Whats_app_banner