मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PNB News : पंजाब नॅशनल बँकेनं वाढवले एफडीचे व्याजदर; किती होणार फायदा?

PNB News : पंजाब नॅशनल बँकेनं वाढवले एफडीचे व्याजदर; किती होणार फायदा?

Jan 04, 2024, 12:50 PM IST

  • PNB FD Rates News : पंजाब नॅशनल बँकेनं मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल केले असून काही ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Punjab National Bank (Mint)

PNB FD Rates News : पंजाब नॅशनल बँकेनं मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल केले असून काही ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.

  • PNB FD Rates News : पंजाब नॅशनल बँकेनं मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल केले असून काही ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.

PNB FD Rates News : गेल्या काही दिवसांपासून बँकांमधील फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरांत सातत्यानं वाढ होत आहे. पंजाब नॅशनल बँकेनंही आता दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवरील एफडीच्या व्याजदरांत बदल केला आहे. बँकेनं विशिष्ट कालावधीच्या एफडींवर ५० बेसिस पॉईंट्सपर्यंत (बीपीएस) वाढ केली आहे. नवे दर १ जानेवारी २०२४ पासून लागू झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

बँकेनं १८० ते २७० दिवसांच्या मुदतीच्या व्याजदरात ०.५० टक्क्यांनी वाढ केली आहे. या मुदत ठेवींवर आता सर्वसामान्य नागरिकांना ६ टक्के व्याज मिळणार आहे. 

२१७ ते १ वर्षापर्यंतच्या एफडीचे दर ०.४५ टक्क्यांनी वाढवले आहेत. या एफडीवर आता सर्वसामान्य नागरिकांना ७.२५ टक्के व्याज मिळणार आहे. 

४०० दिवसांच्या एफडीवरील व्याजदरात बँकेनं ०.४५ टक्क्यांची वाढ केली असून आता हे दर ६.८० टक्क्यांवरून ७.२५ टक्क्यांपर्यंत गेले आहेत. 

नव्या दरानुसार, ७ दिवस ते १० वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर ३.५ ते ७.२५ टक्के व्याज मिळणार आहे.

IPO News : शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करताय?; तुमच्यासाठी येतेय मोठी संधी

या एफडीच्या व्याजदरात कपात

पंजाब नॅशनल बँकेनं ४४४ दिवसांवरील एफडीच्या व्याजदरांत ७.२५ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांपर्यंत म्हणजेच ०.४५ टक्क्यांची कपात केली आहे.

ज्येष्ठ व अतिज्येष्ठ नागरिकांसाठी नवे एफडी दर

नवीन व्याजदरांनुसार, ७ दिवस ते १० वर्षे कालावधीच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ४ ते ७.७५ टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ४.३० ते ८.०५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे.

एसबीआयचे व्याजदर

स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) २७ डिसेंबरपासूनच मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात वाढ केली आहे. हा व्याजदर २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर लागू आहे. त्यानुसार, ७ दिवस ते १० वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर ३.५ ते ७ टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना या ठेवींवर ०.५० टक्के अतिरिक्त व्याज मिळणार आहे.

RBI New Guidelines: तुमचं बँक खातं बंद झालंय? मग ही बातमी वाचा!

बँक ऑफ बडोदाचे व्याजदर

बँक ऑफ बडोदानं रिटेल टर्म डिपॉझिटवरील व्याजदरात ०.१० टक्के १.२५ टक्के वाढ केली आहे. हे दर २९ डिसेंबरपासून २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवर लागू आहेत. नव्या दरांनुसार, बँक ऑफ बडोदाच्या सर्वसामान्य ग्राहकांना ४.२५ ते ७.२५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना ७ दिवस ते १० वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर ४.७५ ते ७.७५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे.

पुढील बातम्या