मराठी बातम्या  /  बिझनेस  /  RBI New Guidelines: तुमचे बँक खाते बंद झाले आहे? तर ही बातमी वाचा, RBI कडून महत्वाची अपडेट

RBI New Guidelines: तुमचे बँक खाते बंद झाले आहे? तर ही बातमी वाचा, RBI कडून महत्वाची अपडेट

Jan 03, 2024 08:46 PM IST

RBINewGuidelines : बँकांमधील बंद किंवा निष्क्रिय खाती आणि दावा न केलेल्या बँकेतील ठेवींबाबत रिझर्व्ह बँकेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

RBI New Guidelines
RBI New Guidelines

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बंद पडलेली बँक खाती (Inoperative Accounts) आणि बँकेत दावा न केलेल्या ठेवींबाबत (Unclaimed Deposits) नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. आरबीआयच्या नव्या गाइडलाइन १ एप्रिल २०२४ पासून लागू होणार आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

रिझर्व्ह बँकेनुसार , बँक खात्यात १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ पडलेली रक्कम RBI च्या जमाकर्ता शिक्षण आण जनजागृती कोष (Depositor Education and Awareness Fund) मध्ये ट्रान्सफर करणे आवश्यक आहे.

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, यापुढे बँकांना निष्क्रिय खात्यांवर किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल कोणताही दंड आकारता येणार नाही. तसेच जर ग्राहकांनी सलग दोन वर्षे बँकिंग व्यवहार केला नसेल तसेच खाते निष्क्रिय झाले असेल तर किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल बँक त्यावर कोणतेही शुल्क आकारू शकणार नाही. हा नियम १ एप्रिलपासून लागू होणार आहे.

RBI च्या नवीन गाईडलाइन्स -

 • बँकांना दरवर्षी अशा खात्यांचा आढावा घ्यावा, ज्यातून ग्राहकांनी एका वर्षाहून अधिक काळ कोणतेच ट्रांजेक्‍शन केलेले नसेल.
 • अशा खातेधारकांना याबाबत लेखी सुचना देण्यात यावी.
 • ग्राहकाने निष्क्रिय खात्याचे कारण सांगितले तर बँकांनी असे खाते आणखी एका वर्षासाठी चालू श्रेणीमध्ये ठेवावे. म्हणजे पुढचे एक वर्ष हे खाते निष्क्रिय ठरवू नये. 
 • जर संबंधित ग्राहक लिखित सूचनेचे उत्तर देत नसेल तर बँकेने तत्काळ खाताधारक किंवा नॉमिनीच्या पत्याची चौकशी करावी.
 • फ्रॉड व फसवणुकीपासून वाचण्यासाठी निष्क्रिय खात्यांना वेगळे करणे महत्वपूर्ण आहे.
 • पुन्हा सक्रिय केलेल्या खात्यांच्या व्यवहाराचे कमीत कमी ६ महिने निरीक्षण करावे.
 • बँकांना व्हिडिओ KYC सह सर्व शाखांमध्ये निष्क्रिय खाती सक्रिय करण्यासाठी आपले KYC अपडेट करण्याची सुविधा द्यावी.
 • ED, कोर्ट, ट्रिब्‍यूनल्‍स आणि अन्‍य तपास यंत्रणांच्या आदेशाने फ्रीज केलेल्या खात्यांची KYC प्रक्रिया पार पडल्यानंतरच सक्रिय केले जाईल. 
 • रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितले की, खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी बँक कोणतेही शुल्क आकारू शकत नाही. तसेच, निष्क्रिय खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास कोणताही दंड आकारला जाऊ शकत नाही.
 • बचत खाती निष्क्रिय असली तरीही बँका त्यावर व्याज देत राहतील.
 •  खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याचा नॉमिनी शोधणे हेही बँकेचे काम आहे.
 • बँकेने आपल्या ग्राहकांचा कार्यकाळ वाढवण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. जर, खाते पुन्हा उघडल्यानंतर, ग्राहकाने रक्कम काढली किंवा डेबिट केली नाही, खात्यात हस्तक्षेप केला नाही, तर बँकेला त्याची माहिती द्यावी लागेल. 

WhatsApp channel
विभाग