मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PM kisan Yojana : पीएम किसानच्या १४ व्या हप्त्यापूर्वी ही महत्त्वाची ४ कामे पटापट करा, अन्यथा…

PM kisan Yojana : पीएम किसानच्या १४ व्या हप्त्यापूर्वी ही महत्त्वाची ४ कामे पटापट करा, अन्यथा…

Jun 19, 2023, 04:05 PM IST

    • PM kisan Yojana : पीएम किसानचा १४ वा हप्ता मिळण्यापूर्वी एकदा संकेतस्थळाला भेट देऊन नवे बदल जाणून घ्या, या बदलांमुळे १२ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे.
PM kisan Yojana HT

PM kisan Yojana : पीएम किसानचा १४ वा हप्ता मिळण्यापूर्वी एकदा संकेतस्थळाला भेट देऊन नवे बदल जाणून घ्या, या बदलांमुळे १२ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे.

    • PM kisan Yojana : पीएम किसानचा १४ वा हप्ता मिळण्यापूर्वी एकदा संकेतस्थळाला भेट देऊन नवे बदल जाणून घ्या, या बदलांमुळे १२ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे.

PM kisan Yojana : पीएम किसानच्या १४ व्या हप्त्यासाठी वाट पाहत असलेल्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने १४ वा हप्ता जाहीर करण्यापूर्वी पीएम किसान पोर्टलमध्ये चार महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. हे बदल कोट्यवधी शेतकऱ्यांवर प्रभाव टाकणार आहेत. १४ वा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

SEBI on KYC : म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, सेबीनं शिथील केले 'हे' नियम

बदल १

पीएम किसानवर बेनिफिशिअरी स्टेट्स पाहण्याची पद्धत बदलली आहे. आता स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन क्रमांक जाणून घेणे महत्त्वाचे असेल. त्यासाठी पोर्टलवर दिलेल्या बेनिफिशिअरी स्टेटसवर क्लिक करा. तिथे रजिस्ट्रेशन क्रमांक टाकून कॅप्चा कोड टाकावा लागेल. त्यानंतर गेट डेटावर क्लिक केल्यानंतर स्टेट्स तुमच्या समोर असेल.

असा तपासा रजिस्ट्रेशन स्टेट्स

नो यूव्हर रजिस्ट्रेशन नंबर लिंकवर क्लिक करा. तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. इथे तुम्ही मोबाईल क्रमांक अथवा आधार क्रमांक टाकून कॅप्चा कोड टाका आणि रजिस्ट्रेशन नंबर टाका.

बदल २

पीएम किसानच्या लाभार्थ्यांना एक सुविधा देण्यात आली आहे. याच पोर्टलवर तुम्ही तुमच्या नावाचे स्पेलिंग्स ठिक करु शकतात. त्यासाठी तुम्ही Name correction as per Aadhar वर क्लिक करा. तुमच्यासमोर एक पेज खुले होईल. नाव करेक्शन करण्यासाठी रजिस्ट्रेशन क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका आणि डिटेल्स भरा.

बदल ३

पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर फाॅर्मर्स काॅर्नरमध्ये एक सुविधा देण्यात आली आहे. तुमच्या मोबाईलवर पीएम किसान मोबाईल अॅप डाऊनलोड करा. त्यासाठी डाऊनलोड पीएम किसान मोबाईल अॅपवर क्लिक करा.

बदल ४

या वेब पोर्टलवर चौथा बदल हा फार्मर्स काॅलममध्ये कऱण्यात आला आहे. इथे एक नवे फिचर जोडण्यात आले आहे. जर तुम्ही पीएम किसान सम्मान निधी योजनेतून नाव काढून घेण्याचा विचार करत असाल तर येथील Voluantry Surrender of PM kisan Benefits वर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपी रजिस्टर्ड करा आणि पुढील प्रक्रियेची सुरुवात करा.

विभाग

पुढील बातम्या