मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PM kisan yojana : जून महिन्याच्या या तारखेला येणार पीएम किसानचा १४ वा हप्ता, अपडेट करा स्टेट्स

PM kisan yojana : जून महिन्याच्या या तारखेला येणार पीएम किसानचा १४ वा हप्ता, अपडेट करा स्टेट्स

May 29, 2023, 12:13 PM IST

    • PM kisan yojana : केंद्र सरकार लवकरच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २००० रुपयांचा १४ हप्ता जमा करण्याची शक्यता आहे. यासाठीची तारीखही घोषित करण्यात आली आहे.
PM kisan yojana HT

PM kisan yojana : केंद्र सरकार लवकरच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २००० रुपयांचा १४ हप्ता जमा करण्याची शक्यता आहे. यासाठीची तारीखही घोषित करण्यात आली आहे.

    • PM kisan yojana : केंद्र सरकार लवकरच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २००० रुपयांचा १४ हप्ता जमा करण्याची शक्यता आहे. यासाठीची तारीखही घोषित करण्यात आली आहे.

PM kisan yojana : केंद्र सरकार लवकरच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हप्त्याचे पैसे जमा करू शकते. पुढील महिन्यात सरकार शेतकऱ्यांना २००० रुपयांची भेट देऊ शकते. यावेळी देशभरातील शेतकरी १४ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम मोदींनी २६ फेब्रुवारी रोजी १३ वा हप्ता जारी केला. ज्या अंतर्गत सुमारे १६८०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

SEBI on KYC : म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, सेबीनं शिथील केले 'हे' नियम

२३ जूनला येईल १४ वा हप्ता

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासाठी जून महिन्यात पैसे हस्तांतरित करू शकते. या वेळी २३ जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपयांचा हप्ता जमा होऊ शकतो, दरम्यान १४ व्या हप्त्याचे पैसे एप्रिल ते जुलै दरम्यान हस्तांतरित केले जाण्याची शक्यता आहे.

३० मे पासून जनसंपर्क अभियान राबवणार

बीजेपी सरकार ३० मे पासून जनसंपर्क अभियान राबवणार आहे. यात पंतप्रधान मोदी संबोधित करतील. यादरम्यानच पीएम किसानचा १४ वा हप्तादेखील हस्तांतरित करण्यात येणार आहे.

थोडक्यात असं चेक करा तुमचं स्टेट्स

- पीएम किसानच्या संकेतस्थळावर जा

- आता फार्मर्स काॅर्नरवर क्लिक करा

- आता Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.

- तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

- येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.

- यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

पीएम किसान केवायसी

पीएम किसान वेबसाइटनुसार, पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. केवायसी ऑनलाइन करायचे असल्यास, ओटीपी आधारित ईकेवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे. शेतकरी बायोमेट्रिक आधारित केवायसी देखील करू शकतात. यासाठी बायोमेट्रिक आधारित केवायसीसाठी सीएससी केंद्रांना भेट देऊन केवायसी करता येईल. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पीएम किसानच्या १४ व्या हप्त्याचा लाभ हवा असेल, तर लवकरच केवायसी करणे फायद्याचे ठरेल.

विभाग

पुढील बातम्या