मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहात?; 'ही' एक चूक तुम्हाला पडू शकते महागात

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहात?; 'ही' एक चूक तुम्हाला पडू शकते महागात

Apr 07, 2023, 07:07 PM IST

  • PM Kisan Yojana 14th installment : पीएम किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांनी आर्थिक स्थितीविषयी योग्य माहिती देणं गरजेचं आहे.

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana 14th installment : पीएम किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांनी आर्थिक स्थितीविषयी योग्य माहिती देणं गरजेचं आहे.

  • PM Kisan Yojana 14th installment : पीएम किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांनी आर्थिक स्थितीविषयी योग्य माहिती देणं गरजेचं आहे.

PM Kisan Yojana 14th installment : देशभरातील शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या १४ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. नव्या हप्त्याची रक्कम मे महिन्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ही घोषणा कधीही होऊ शकते. मात्र, पीएम किसान निधीचा लाभ घेणाऱ्यांना एक चूक भलतीच महागात पडू शकते.

ट्रेंडिंग न्यूज

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

पीएम-किसान योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. वर्षातून तीन वेळा दोन-दोन हजार रुपये लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जातात. ही योजना शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना, दिलासादायक ठरली आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं काही निकष ठेवले आहेत. त्यात न बसणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना स्वत:च्या आर्थिक स्थितीबाबत काही गोष्टी जाहीर कराव्या लागतात.

यातील महत्त्वाची बाब इन्कम टॅक्स विवरण पत्रासंबंधी आहे. म्हणजेच, एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यानं मागील मूल्यांकन वर्षात (Assessment Year) इन्कम टॅक्स भरलेला असेल, तर ते कुटुंब पीएम-किसान योजनेअंतर्गत लाभांसाठी पात्र ठरत नाही. त्यामुळं योजनेचा लाभ घेताना याबाबत योग्य माहिती देणं गरजेचं आहे.

ही माहिती चुकीची निघाल्यास संबंधित लाभार्थी अपात्र घोषित केला जाईल. इतकंच नव्हे, तर कायद्यानुसार त्याच्यावर दंडात्मक कारवाईही होऊ शकते. याशिवाय त्याला आतापर्यंत दिलेले हप्तेही परत करावे लागू शकतात. लाभार्थी म्हणून डिक्लेरेशन देताना शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यायला हवी.

 

विभाग

पुढील बातम्या