मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PM Kisan Yojana : कोट्यवधी शेतकऱ्यांना ६००० रुपयांऐवजी मिळणार १२ हजार रुपये, राज्य सरकारचा निर्णय

PM Kisan Yojana : कोट्यवधी शेतकऱ्यांना ६००० रुपयांऐवजी मिळणार १२ हजार रुपये, राज्य सरकारचा निर्णय

Jun 02, 2023, 06:12 PM IST

    • PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नमो किसान महासन्मान योजना सुरू केली आहे. दीड कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
namo kisan maha samman scheme HT

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नमो किसान महासन्मान योजना सुरू केली आहे. दीड कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

    • PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नमो किसान महासन्मान योजना सुरू केली आहे. दीड कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांची आर्थिक ताकद आणि उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कल्याणकारी योजना राबवत आहेत. यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 'नमो किसान महा सन्मान योजना' लागू केली आहे. त्याअंतर्गत आता शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये मिळणार आहेत. त्याच बरोबर शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा योजनेचा लाभ दिला जात आहे. महाराष्ट्रातील दीड कोटीहून अधिक शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक १२ हजार रुपये

मार्च २०२३ मध्ये अर्थसंकल्प सादर करताना राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो किसान महासन्मान निधी योजना सुरू करण्याची घोषणा केली. आता राज्य मंत्रिमंडळाने या योजनेला मान्यता देऊन ती लागू करण्यात आलली आहे. नमो किसान महासन्मान निधी योजनेंतर्गत राज्य सरकार लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये देणार आहे. तर पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना ६००० रुपये दिले जाणार आहेत. अशाप्रकारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता, नेमका हाच निर्णय राज्याने घेतला असून, त्यात राज्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये जमा होणार आहेत.

नमो किसान महासन्मान निधी योजनेंतर्गत ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना ३ हप्त्यांमध्ये दिली जाईल, पंतप्रधान किसान योजनेच्या रक्कम हस्तांतरित प्रक्रियेप्रमाणेच ही प्रक्रिया असेल. नमो किसान महासन्मान निधी योजनेसाठी राज्य सरकार ६९०० कोटी रुपयांचा खर्च करणार आहे, याची घोषणा राज्य सरकारने आधीच केली आहे. महाराष्ट्रातील १.५ कोटी शेतकऱ्यांना नमो किसान महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.

पिक विमा योजना

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ अवघ्या १ रुपयात देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने अर्थसंकल्पात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५,००० रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले आहे. तर मत्स्यशेतकऱ्यांना पाच लाख रुपयांचा विमा देण्यास सुरुवात केली आहे.

विभाग

पुढील बातम्या