मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PM kisan Yojana : अपडेट ! पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

PM kisan Yojana : अपडेट ! पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

Jun 28, 2023, 06:42 PM IST

    • PM kisan Yojana : पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता २७ फेब्रुवारी २०२३ ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता १४ व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे.
PM kisan Yoajana HT

PM kisan Yojana : पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता २७ फेब्रुवारी २०२३ ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता १४ व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे.

    • PM kisan Yojana : पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता २७ फेब्रुवारी २०२३ ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता १४ व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे.

PM kisan Yojana : देशभरातील सुमारे १० कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र, किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता काही काळ रखडला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

पण आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीची रक्कम ३० जूनपर्यंत येण्याची शक्यता होती. आता तो जूलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो.

या दिवशी जमा झाला १३ वा हप्ता

याआधी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात १३ वा हप्ता आला होता. हा हप्ता जाहीर करण्याची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. वास्तविक, पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करते. मोदी सरकार हे पैसे २००० रुपयांच्या ३ हप्त्यांमध्ये जारी करते. मात्र, आता १४ व्या हप्त्याबाबत शेतकरी चिंतेत असून सोशल मीडियावरही या चर्चेला उधाण आले आहे.

या लोकांच्या खात्यात पैसे येणार नाहीत

अनेकांना पीएम किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता मिळणार नाही. वास्तविक ज्या लोकांना १३ वा हप्ता अद्याप आलेला नाही किंवा ज्यांचे ई-केवायसी अद्याप झालेले नाही त्यांना १४ वा हप्तादेखील मिळणार नाही.

केवायसी अनिवार्य

तुमच्या आधार कार्डमध्ये चूक झाली तरी तुमचा १४ वा हप्ता थांबवला जाऊ शकतो. दुसरीकडे, जर तुमचे ई-केवायसी झाले नसेल, तर ते पूर्ण करा. यासोबतच तुमच्या आधार कार्डमध्ये काही चूक असल्यास ती त्वरित दुरुस्त करा. तर असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या बँक खात्यात काही अडचणींमुळे पीएम किसान सन्मान निधीचे पैसे वेळेवर येत नाहीत, अशा लोकांनीही त्यांच्या बँक खात्यातील तांत्रिक चुका लवकरात लवकर दुरुस्त कराव्यात.

विभाग

पुढील बातम्या