मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Ola S1 Pro vs Ather 450 Apex: ओला एस १ प्रो की एथर ४५० एपेक्स, कोणती इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करावी?

Ola S1 Pro vs Ather 450 Apex: ओला एस १ प्रो की एथर ४५० एपेक्स, कोणती इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करावी?

Feb 25, 2024, 08:43 AM IST

    • Best Electric Scooter: ओला एस 1 प्रो मध्ये अधिक रेंज आणि पॉवर आहे. परंतु. एथर 450 एपेक्स लिमिटेड एडिशन स्कूटर आहे.
The design of both electric scooters is radically different.

Best Electric Scooter: ओला एस 1 प्रो मध्ये अधिक रेंज आणि पॉवर आहे. परंतु. एथर 450 एपेक्स लिमिटेड एडिशन स्कूटर आहे.

    • Best Electric Scooter: ओला एस 1 प्रो मध्ये अधिक रेंज आणि पॉवर आहे. परंतु. एथर 450 एपेक्स लिमिटेड एडिशन स्कूटर आहे.

Ola S1 Pro And Ather 450 Apex Price and Specifications: भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहन विशेषत: दुचाकी ग्राहकांना आकर्षित केले आहे. ओला एस १ प्रो ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक आहे. मात्र, या स्कूटरला टक्कर देण्यासाठी एथर कंपनीने त्यांची नवी इलेक्ट्रीक स्कूटर एथर ४५० बाजारात लॉन्च केली आहे. दोन्ही इलेक्ट्रीक स्कूटर दमदार फीचर्ससह लॉन्च करण्यात आल्या आहेत. यामुळे यापैकी कोणत्या स्कूटरची निवड करणे योग्य ठरेल, असा प्रश्न अनेक ग्राहकांना पडला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

लूक्स

दोन्ही स्कूटर खूप वेगळ्या दिसतात. एस १ प्रो त्या फ्रंट हेडलॅम्पसह थोडा फंकी दिसतो, जो लगेच ओला म्हणून ओळखला जातो. त्यानंतर एथर स्कूटर आहे, जी अधिक स्पोर्टी आणि शार्प दिसते आणि आकारानेही लहान आहे. 

Range Rover Velar : रेंज रोव्हर वेलार खरेदी करा अगदी स्वस्तात; कंपनीकडून थेट ६.४० लाख रुपयांची कपात

 

बॅटरी आणि रेंज

ओला एस १ प्रोमध्ये ४ किलोवॅट बॅटरी पॅक आहे, जो इको आणि नॉर्मल मोडमध्ये १८० किमी आणि १४३ किमीची रेंज देऊ शकतो. दुसरीकडे, एथर ४५० एपेक्समध्ये ३.७ केडब्ल्यूएचची बॅटरी पॅक आहे आणि ही स्कूटर एक चार्जवर ११० किलोमीटर धावते.

परफॉर्मन्स

ओला एस १ प्रोची टॉप स्पीड १२० किमी प्रतितास आहे आणि २.६ सेकंदात ०-४० किमी प्रतितास वेग पकडू शकते. तर, एथर ४५० एपेक्सची टॉप स्पीड १०० किमी प्रतितास आहे. या स्कूटरला ०- ४० किमी प्रतितास वेग घेण्यास २.९ सेकंदाचा वेळ लागतो.

Ather Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर एथर ४५० एक्स आणि ४५० एस मध्ये मिळतायेत 'हे' नवीन फीचर्स

 

फीचर्स

दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर टचस्क्रीन इंस्ट्रूमेंट क्लस्टरसह येतात. ४५० एपेक्स एथरस्टॅकवर चालते. तर एस १ प्रो मूव्हओएसवर चालते. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि मोबाइल अॅप्लिकेशन देखील आहे. एथरमध्ये मॅजिकट्विस्ट फीचर आहे. तर ओलामध्ये टेम्पर अलर्ट आणि पार्टी मोड देण्यात आला आहे.

किंमत

किंमत एस १ प्रोची किंमत १.३० लाख रुपये आहे. तर, ४५० एपेक्सची किंमत १.८९ लाख रुपये आहे. दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत. एथर ४५० एपेक्स हे लिमिटेड एडिशन मॉडेल आहे.

विभाग

पुढील बातम्या