मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Range Rover Velar : रेंज रोव्हर वेलार खरेदी करा अगदी स्वस्तात; कंपनीकडून थेट ६.४० लाख रुपयांची कपात

Range Rover Velar : रेंज रोव्हर वेलार खरेदी करा अगदी स्वस्तात; कंपनीकडून थेट ६.४० लाख रुपयांची कपात

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 22, 2024 04:08 PM IST

Range Rover Velar Price Drop: भारतात गेल्या वर्षी रेंज रोव्हर वेलार फेसलिफ्ट ९४.३० लाख रुपये किंमतीसह लॉन्च करण्यात आली होती.

The Range Rover Velar facelift is now more accessible by  ₹6.40 lakh and retails at  ₹87.90 lakh (ex-showroom)
The Range Rover Velar facelift is now more accessible by ₹6.40 lakh and retails at ₹87.90 lakh (ex-showroom)

Range Rover Velar Price in India: लँड रोव्हरने भारतातील रेंज रोव्हर व्हेलारच्या किंमतीत ६.४० लाख रुपयांची कपात केली आहे. भारतात गेल्या वर्षी रेंज रोव्हर वेलार फेसलिफ्ट ९४.३० लाख रुपये किंमतीसह (एक्स-शोरूम) लॉन्च करण्यात आली होती.  मात्र, आता 2024 रेंज रोव्हर वेलार ८७.९० लाख किंमतीसह (एक्स-शोरूम) बाजारात उपलब्ध आहे. लँड रोव्हर इंडियाने वेलारला पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह सिंगल फुल लोडेड व्हेरिएंटमध्ये रिटेल केले आहे. 

नवीन वेलार फेसलिफ्टमध्ये पिक्सल एलईडी हेडलॅम्प्स, स्पोर्टी लुकसाठी फ्रंट आणि रियरमध्ये सुधारित बंपर आणि इतर रेंज रोव्हर मॉडेल्सच्या अनुषंगाने मॉडेल आणण्यासाठी रिवर्क फ्रंट ग्रिलसह अनेक अपग्रेड्स देण्यात आले आहेत. मागील बाजूस नवीन रॅपअराउंड एलईडी टेललाइट्स देण्यात आले आहेत. तर प्रोफाइलमध्ये काही बदल करण्यासाठी फ्लेयर्ड व्हील कमानीसह नवीन अलॉय व्हील्स आहेत. लँड रोव्हरने वेलार फेसलिफ्टमध्ये मेटॅलिक व्हेरेसिन ब्लू आणि प्रीमियम मेटॅलिक झादर ग्रे असे दोन नवे रंग सादर केले आहेत.

केबिनमध्ये मोठ्या रेंज रोव्हरकडून नवीन ११.४ इंच कर्व्ड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह प्रमुख अपडेट्स देखील मिळाले आहेत. नवीन युनिटमध्ये वायरलेस चार्जिंग, अ‍ॅक्टिव्ह रोड नॉइस कॅन्सलेशन, एअर प्युरिफायर आणि दोन नवीन लेदर कलरवे- कॅरावे आणि डीप गार्नेट सारख्या वैशिष्ट्यांसह नवीनतम पिव्ही प्रो इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. या एसयूव्हीमध्ये मल्टी झोन क्लायमेट कंट्रोल, एअर सस्पेंशन, पॅनोरॅमिक सनरूफ आणि बरेच काही देण्यात आले आहे.

2024 रेंज रोव्हर वेलार पॉवर २.० लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन ऑप्शनमध्ये येते. टर्बो पेट्रोल मोटर २४७ बीएचपी पॉवर आणि ३६५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. तर, डिझेल २०१ बीएचपी पॉवर आणि ४३० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले असून ऑल-व्हील ड्राइव्ह (एडब्ल्यूडी) सह टेरेन रिस्पॉन्स २ सिस्टम देखील देण्यात आले आहे.

2024 रेंज रोव्हर वेलारची व्होल्वो एक्ससी ९० (१.०१ कोटी रुपये), ऑडी क्यू ७ (९४.४५ लाख रुपये), मर्सिडीज बेंझ जीएलई (९६.४० लाख रुपये) आणि बीएमडब्ल्यू एक्स ५ (९६ लाख रुपये) यासह अनेक गाड्यांशी स्पर्धा आहे.

WhatsApp channel

विभाग