मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual funds : तीन वर्षांत तब्बल १५२ टक्के रिटर्न्स, ही आहे ‘या’ स्मॉल कॅप फंडाची जादू

Mutual funds : तीन वर्षांत तब्बल १५२ टक्के रिटर्न्स, ही आहे ‘या’ स्मॉल कॅप फंडाची जादू

Jan 26, 2023, 12:24 PM IST

  • Small Cap Mutual funds :  कोरोनानंतरच्या तीन वर्षांच्या काळात या स्माॅल कॅप म्युच्युअल फंडाने तीन वर्षांत तब्बल १५२ टक्के रिटर्न्स दिले आहेत. जाणून घेऊया या फंडाचा नेमका फंडा काय आहे तो -

Mutual funds HT

Small Cap Mutual funds : कोरोनानंतरच्या तीन वर्षांच्या काळात या स्माॅल कॅप म्युच्युअल फंडाने तीन वर्षांत तब्बल १५२ टक्के रिटर्न्स दिले आहेत. जाणून घेऊया या फंडाचा नेमका फंडा काय आहे तो -

  • Small Cap Mutual funds :  कोरोनानंतरच्या तीन वर्षांच्या काळात या स्माॅल कॅप म्युच्युअल फंडाने तीन वर्षांत तब्बल १५२ टक्के रिटर्न्स दिले आहेत. जाणून घेऊया या फंडाचा नेमका फंडा काय आहे तो -

Mutual funds : गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला गुंतवणूकीसाठी पर्याय मानला जातो. कारण त्यातून मजबूत रिटर्न्स मिळतातच पण त्याचबरोबर फंड हाऊसेसच्या सखोल संशोधनानंतर तुमचे लाखमोलाचे पैसे गुंतवले जातात.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

अशा अनेक योजनांनी गेल्या ३ वर्षांत गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. ३ वर्षांचा काळ खास आहे. कारण कोरोनाची सुरुवात तीन वर्षांपूर्वी झाली होती. तेव्हा शेअऱ बाजारात बरीच घसरण झाली होती. पण त्यानंतर जेव्हा बाजार सावरायला सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्स-निफ्टीने नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. म्युच्युअल फंडांनाही याचा फायदा झाला. त्यामुळे अशाच एका म्युच्युअल फंडाची माहिती देत आहोत की ज्याने ३ वर्षांत गुंतवणूकदारांच्या पैशांमध्ये अडीच पटीने वाढ केली आहे.

बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंड म्युच्युअल फंड योजना

बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंड म्युच्युअल फंड योजनेने ३ वर्षात १५१.८६% पूर्ण परतावा दिला आहे. या कालावधीत ३५.५३ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. जो कॅटेगरी अॅव्हरेच रिटर्न्सपेक्षा तब्बल सरासरी २७ टक्के जास्त आहे. अंदाजे १५१.८६ टक्के पूर्ण परतावा म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे अडीच पटीने वाढले आहेत.

अंदाजे ४११.८१ कोटी रुपयांचा हा स्माॅल कॅप फंड असूनही त्याने त्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत अंदाजे १८४.३०% पूर्ण परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने ३ वर्षांसाठी दरमहा रु. १० हजारांची एसआयपी सुरू केली असेल, तर आज गुंतवणुकीचे मूल्य रु. ५,४६ लाख झाले असतील. तुम्हाला एकूण ३.६ लाख एसआयपी गुंतवणूक रकमेवर ५१.७८ टक्के परतावा मिळाला असता. मात्र।गेल्या तीन वर्षांतील या फंडाची कामगिरी कायम राहिल याबाबत शाश्वती नाही, हे सध्या लक्षात घेणे गरजेचे आहे.

असा आहे फंड पोर्टफोलियो

फंडाच्या पोर्टफोलिओबद्दल बोलायचे झाल्यास, त्यातील ९४.६ टक्के इक्विटी आणि उर्वरित रोख आहे. त्याच्या टाॅप ४ क्षेत्रातील होल्डिंगमध्ये बांधकाम (१६.१ टक्के), वित्तीय (१५.३ टक्के), भांडवली वस्तू (१३.२ टक्के) आणि रसायने (१३.२ टक्के) यांचा समावेश आहे. बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंडच्या पोर्टफोलिओमध्ये ६५ कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय़ बँक, फेडरल बँक, कॅनरा बँक आणि सिटी युनियन बँक लि. यासारख्या आघाडीच्या बँकांचा समावेश आहे. अपोलो ग्रुपचा भाग असलेल्या आणि गेल्या काही वर्षांत जोरदार कामगिरी करणारे दोन समभाग त्याच्या मालकीचे आहेत.

रेटिंग

क्रिसिलने बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅपला दुसरे आणि मॉर्निंगस्टारने ५ स्टार रेटिंग दिले आहे. फंडाचे इक्विटीच्या पोर्टफोलिओमध्ये ९४.६ टक्के भागभांडवल आहे, तर रोख रकमेचे फारच कमी एक्सपोजर आहे आणि कर्जाचे कोणतेही एक्सपोजर नाही. यातील एक मोठा भाग बांधकाम क्षेत्रात आहे, जे क्षेत्र सध्या खूप अस्थिर आहे. त्यामुळे या फंडात गुंतवणूक करताना जोखीम खूप जास्त असते. त्यामुळे ही जोखीम लक्षात ठेवूनच गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

 

विभाग

पुढील बातम्या