मराठी बातम्या  /  business  /  Multibagger Stocks : एका महिन्यात या शेअर्सने दिला ५० % पेक्षा अधिक परतावा, पहा स्टाॅक डिटेल्स
Multibagger stocks HT
Multibagger stocks HT

Multibagger Stocks : एका महिन्यात या शेअर्सने दिला ५० % पेक्षा अधिक परतावा, पहा स्टाॅक डिटेल्स

24 January 2023, 13:10 ISTKulkarni Rutuja Sudeep

Multibagger Stocks : शेअर बाजारातील गुंतवणूक हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज अशाच एका स्टाॅकबद्दल माहिती देत आहोत, ज्याने महिन्याभरात अंदाजे ५० टक्क्यांपेक्षा अधि्क परतावा दिला आहे.

Multibagger Stocks : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे खूप जोखमीचे मानले जाते, परंतु जर तुम्ही योग्य ठिकाणी पैसे गुंतवले तर तुम्हाला मजबूत परतावा मिळू शकतो. असे शेअर्स गुंतवणूकदारांना खूप कमी वेळात श्रीमंत बनवतात, अशा शेअर्सना मल्टीबॅगर शेअर्स म्हणतात.

ट्रेंडिंग न्यूज

आज आम्‍ही तुम्‍हाला अशा शेअरची माहिती देणार आहोत, ज्याने १ महिन्‍यात गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला आहे. हा स्टॉक स्टर्लिंग टूल्स आहे. या समभागाने १ महिन्यात गुंतवणूकदारांना ५०% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

जर तुम्ही या शेअरमध्ये २२ डिसेंबर २०२२ रोजी अंदाजे १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर २३ जानेवारी २०२३ पर्यंत या शेअरने गुंतवणूकदारांना एकूण अंदाजे दीड लाख रुपयांचा परतावा दिला आहे. अशा परिस्थितीत अवघ्या एका महिन्याच्या छोट्या कालावधीत गुंतवणूकदारांना एकूण ५० हजार रुपयांचा नफा मिळाला आहे.

परतावा दीर्घकालीनही !

गेल्या एका वर्षात, स्टर्लिंग टूल्सने गुंतवणूकदारांना टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा दिला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही २३ जानेवारी २०२२ रोजी या शेअरमध्ये एकूण १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर एक वर्षानंतर तुम्हाला आज १.९७ लाख रुपयांचा परतावा मिळाला असता. एका वर्षाच्या कमी कालावधीत तुमचे पैसे दुप्पट झाले आहेत आणि गुंतवणूकदार कमी वेळात श्रीमंत झाले आहेत.

कंपनीचे तपशील जाणून घ्या-

स्टर्लिंग टूल्स वाहन फास्टनरच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहे. फास्टनरचा हा दुसरा सर्वात मोठा उत्पादक आहे. या भागाची मागणी बहुतांशी फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठी आहे. आणि ते मोटर कंट्रोल युनिट (एमसीयू) पुरवते. या कंपनीच्या विक्रीपैकी १७ टक्के विक्री केवळ ईव्ही मार्केटमधून येते. अशा स्थितीत ईव्हीच्या वाढत्या बाजारपेठेसोबतच या कंपनीच्या नफ्यातही लवकरात लवकर वाढ होण्याची शक्यता आहे.

 

विभाग