मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PPF : पीपीएफ योजना तुम्हाला बनवू शकते करोडपती; अशी करा गुंतवणूक

PPF : पीपीएफ योजना तुम्हाला बनवू शकते करोडपती; अशी करा गुंतवणूक

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 24, 2023 03:20 PM IST

PPF Account : पीपीएफ योजनेचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षे आहे. गुंतवणूकदार इच्छेनुसार हा कालावधी ५ वर्षापर्यंत वाढवू शकतो

PPF HT
PPF HT

PPF Account : पीपीएफ खाते म्हणजेच पब्लिक प्राॅव्हिटंड फंड ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. नोकरदार आणि नोकरी न करणाऱ्या व्यक्तींसाठी पीपीएफ योजना ही गुंतवणूकीसाठी अत्यंत चांगली योजना मानली जाते.

दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याच्या प्रक्रियेत पीपीएफ योजनेची भूमिका महत्त्वाची मानली जाते. कारण पीपीएफमधून प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस तुमच्या खात्यात पैसे जमा होतात. पीपीएफचा समावेश एक्झम्प्ट एक्झम्प्ट एक्झम्प्ट (ईईई) कॅटेगरीत समावेश होतो. पीपीएफ खातेधारकांना करमुक्त व्याज मिळते. यामुळे तुम्ही १५व्या वर्षी किंवा नंतर बाहेर पडता तेव्हा मॅच्युरिटी रक्कम करमुक्त होते. पगारदार कर्मचारी आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत कर माफीसाठी दावा करू शकतात.

पीएफएफ खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडता येते. पीपीएफ खात्यामध्ये, खातेदाराला खाते उघडण्याचे वर्ष वगळता योजनेच्या ५ वर्षानंतर एका आर्थिक वर्षात फक्त एकदाच पैसे काढण्याची परवानगी आहे. कारण या खात्याचा लाॅक इन कालावधी १५ वर्षांचा आहे.

पीपीएफ खात्याची मर्यादा

पीपीएफ खात्यात आर्थिक वर्षात किमान ५०० रुपयांची गुंतवणूक करण्याची परवानगी आहे, तर कमाल मर्यादा एका वर्षात दीड लाख रुपये आहे.

पीपीएफ व्याज

पीपीएफवरीर व्याज दर वार्षिक चक्रवाढ दरानुसार अंदाजे ७.१ टक्के आहे. पीपीएफ योजनेला भारत सरकारचा पाठिंबा आहे.या योजनेत हमखास जोखीममुक्त परतावा मिळतो.

मुदतपूर्व पैसे काढण्याची मुभा

गुंतवणूकदार १५ वर्षांच्या मुदतीपूर्वी अंशत खात्यातून पैसे काढू शकतो. यात सातव्या वर्षांपासून आंशिक पैसे काढण्याची मुभा मिळते. त्यानंतर संपूर्ण निधी १५ वर्षानंतर काढता येईल.

अत्यंत महत्त्वाचे - पीपीएफ कॅल्युलेटर

कालावधी - २५ वर्षे

वार्षिक गुंतवणूक – रु १,५०,०००

व्याजदर – ७.१% (वर्तमान दर)

एकूण गुंतवणूक - रु. ३७,५०,०००

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग