मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger Stock: लाखाचे झाले अडीच कोटी! 'या' शेअरनं भरली गुंतवणूकदारांची झोळी

Multibagger Stock: लाखाचे झाले अडीच कोटी! 'या' शेअरनं भरली गुंतवणूकदारांची झोळी

May 01, 2023, 12:41 PM IST

  • Tanla Platforms : हैदराबाद स्थित तान्ला प्लॅटफॉर्म्स या कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना दहा वर्षांत तब्बल २४,५६१ टक्क्यांचा परतावा दिला आहे.

Multibagger Stock

Tanla Platforms : हैदराबाद स्थित तान्ला प्लॅटफॉर्म्स या कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना दहा वर्षांत तब्बल २४,५६१ टक्क्यांचा परतावा दिला आहे.

  • Tanla Platforms : हैदराबाद स्थित तान्ला प्लॅटफॉर्म्स या कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना दहा वर्षांत तब्बल २४,५६१ टक्क्यांचा परतावा दिला आहे.

Multibagger Stock : पुरेसा अभ्यास न करता शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीमुळं जसा फटका बसू शकतो, तसाच योग्य दिशेनं व पुरेसा संयम ठेवून गुंतवणूक केल्यास मोठा फायदाही होऊ शकतो. Tanla Platforms या कंपनीनं हुशार गुंतवणूकदारांना असाच फायदा मिळवून दिला आहे. गेल्या १० वर्षांत या कंपनीनं तब्बल २४,५६१ टक्क्यांचा परतावा दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

icici vs axis bank : आयसीआसीआय बँक की अ‍ॅक्सिस बँक? कोणता शेअर जास्त चांगला आणि का?

Income tax filing : पगारदार करदाते असाल तर 'या' पाच गोष्टी नीट लक्षात ठेवा, अन्यथा होईल मनस्ताप

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

तान्ला प्लॅटफॉर्म्सच्या शेअर्समध्ये मागच्या एका महिन्यात २१ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षभरात हा शेअर ५२ टक्क्यांनी गडगडला असला तरी दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना या शेअरनं जबरदस्त नफा मिळवून दिला आहे. गेल्या ५ वर्षांत तान्ला प्लॅटफॉर्म्सच्या शेअरमध्ये १,८७१.५१ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर १० वर्षांत या शेअरनं २४,५६१ टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत.

Employment fraud: स्वयंरोजगाराच्या नावाखाली तब्बल ४० हजार तरुणांची फसवणूक, नऊ कोटी उकळले!

१ लाखाचे झाले २ कोटी ४६ लाख

ऑगस्ट २०१३ मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त २.७५ रुपये होती, ती आज ६७८.२० रुपये झाली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांच्या पैशांमध्ये २४६ पट वाढ झाली आहे. आकडेमोड करायची झाल्यास, १० वर्षांपूर्वी तान्लाच्या शेअरमध्ये एखाद्यानं १ लाख रुपये गुंतवले असते तर आज ते २.४६ कोटी रुपये झाले असते.

तान्ला प्लॅटफॉर्म्स करते काय?

हैदराबादस्थित तान्ला प्लॅटफॉर्म्स ही कंपनी कम्प्युटर सॉफ्टवेअर निर्मितीच्या क्षेत्रात आहे. ही कंपनी मेसेजिंग, व्हॉइस, इंटरनेट आणि इतर क्लाउड कम्युनिकेशनशी संबंधित सोल्यूशन्सची निर्मिती करते. त्याचबरोबर, अद्ययावत तंत्रज्ञान व उत्पादनांची निर्मिती करते. स्टॉक एक्सचेंजेसकडील माहितीनुसार, या कंपनीचे बहुतांश शेअर्स लोकांकडे आहेत. कंपनीचे ५५.८३ टक्के शेअर्स सर्वसाधारण जनतेकडं आणि ४४.१७ टक्के शेअर्स प्रवर्तकांकडं आहेत.

Wipro : ‘विप्रो’च्या शेअरधारकांना कमाईची संधी! कंपनीनं घेतला मोठा निर्णय

चौथ्या तिमाहीत तान्ला प्लॅटफॉर्म्सचा वार्षिक महसूल २ टक्क्यांनी घसरून ८३३ कोटी रुपयांवर आला, तर करानंतरचा नफा (profit after tax) 120 कोटी रुपये होता. कंपनीच्या नफ्यात मागील वर्षीच्या १४१ कोटी रुपयांच्या तुलनेत जवळपास १५ टक्क्यांनी घट झाली आहे. या तिमाहीत कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट १६६ कोटी रुपये होते.

विभाग

पुढील बातम्या