मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Maharashtra Budget 2024 : राज्याच्या अर्थसंकल्पात तुमच्या फायद्याचं काय? पाहा महत्त्वाच्या घोषणा

Maharashtra Budget 2024 : राज्याच्या अर्थसंकल्पात तुमच्या फायद्याचं काय? पाहा महत्त्वाच्या घोषणा

Feb 27, 2024, 03:34 PM IST

  • Maharashtra Interim Budget 2024 : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. पाहूया अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

Maharashtra Budget Session 2024

Maharashtra Interim Budget 2024 : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. पाहूया अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

  • Maharashtra Interim Budget 2024 : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. पाहूया अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

Maharashtra Interim Budget 2024 highlights : राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अंतिरम अंर्थसंकल्प सादर केला. अजित पवारांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत ३०० युनिटपर्यंत वीज माफ करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. तसंच नवी मुंबईतील विमानतळांचं काम वर्षभरात पूर्ण करण्याची घोषणाही त्यांनी केली.

ट्रेंडिंग न्यूज

Income tax filing : पगारदार करदाते असाल तर 'या' पाच गोष्टी नीट लक्षात ठेवा, अन्यथा होईल मनस्ताप

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

अर्थसंकल्पातील ठळक घोषणा

> मुंबईतील पूर्व मुक्त मार्गाचा (Eastern Free Way) ठाण्यापर्यंत विस्तार करणार 

> प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका उपलब्ध करून देणार

> अंत्योदय शिधापत्रिकेवर एका कुटुंबाला एक साडी मोफत दिली जाणार

> संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारी पेन्शन १००० वरून १५०० केली जाणार

> दिव्यांगासाठी ३४ हजार घरकुलं बांधली जाणार

> १८ हजार लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करून ३६ हजार नोकऱ्या देणार

> राज्यातील सर्व उपसा सिंचन योजनांचे येत्या दोन वर्षांत सौर ऊर्जाकरण

> ⁠⁠लोणावळा इथं जागतिक दर्जाचा स्काय वॉक प्रकल्प उभारला जाणार

> सुमारे ३७ हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच पुरवणार

> डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनविकास योजनेअंतर्गत १ लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान

> नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत ८४ लाख ५७ हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी सुमारे १,६९१ कोटी रुपये देणार 

> स्वयंपूर्ण रोजगाराचा भाग म्हणून दहा शहरांतील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा देणार

> नागपुरातील एम्सच्या धर्तीवर पुण्यातील औंध इथं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था उभारणार

> ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना सुरू करणार

> सर्व जिल्ह्यांमध्ये १५ खाटांचे डे केअर केमोथेरपी सेंटर सुरू करणार

> २३४ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांत डायलिसिस सेवा केंद्र सुरू करणार

> ⁠अयोध्या आणि जम्मू काश्मीर इथं महाराष्ट्र भवन बांधणार

> वढू येथील स्मारकाला पावने तीनशे कोटी रुपये

> दिल्ली , गोवा आणि बेळगाव या ठिकाणी मराठी भाषा भवन उभारलं जाणार

> संत गाडगेबाबा महामंडळाची स्थापना करणार

> नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा

> वाशिम, हिंगोली, जालना, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक व ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ इथं प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचं नवीन शासकीय महाविद्यालय व संलग्नित ४३० खाटांचं रुग्णालय उभारणार

> जळगाव, बारामती, लातूर, नंदूरबार, गोंदिया, कोल्हापूर आणि मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचं शासकीय परिचर्चा महाविद्यालय सुरू करणार

पुढील बातम्या