मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra fadanvis : शिवरायांचं नाव घेता आणि लोकांची आई-बहीण काढता?; फडणवीसांनी जरांगेंना सुनावले

Devendra fadanvis : शिवरायांचं नाव घेता आणि लोकांची आई-बहीण काढता?; फडणवीसांनी जरांगेंना सुनावले

Feb 27, 2024 12:42 PM IST

Devendra Fadnavis Slams Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी वापरलेल्या भाषेवरून देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांना चांगलंच सुनावलं.

Devendra Fadnavis on Manjo Jarange Patil
Devendra Fadnavis on Manjo Jarange Patil

Devendra Fadnavis Slams Manoj Jarange Patil : ‘कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला छत्रपतींनी सन्मानानं परत पाठवलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि लोकांच्या आया-बहिणी काढता?,’ असा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना सुनावलं.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज पुन्हा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ झाला. जरांगे यांनी फडणवीसांबद्दल वापरलेल्या भाषेचाही निषेध करण्यात आला व त्यांच्या आंदोलनाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांनी ती मान्य करून एसआयटी चौकशी स्थापन करण्याचे आदेश दिले.

ट्रेंडिंग न्यूज

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभागृहात यावेळी आपली भूमिका मांडली. 'मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी जे केलं आहे ते सर्वांना माहीत आहे. माझ्याच कार्यकाळात आरक्षणाचा निर्णय झाला. मुख्यमंत्री असेपर्यंत मी तो टिकवला देखील. याशिवाय, सारथी सारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठा तरुणांना मदत झाली. त्यामुळं मला कुणाकडूनही सर्टिफिकेटची गरज नाही, असं फडणवीस म्हणाले.

'मनोज जरांगे पाटील यांनी माझ्याबद्दल जी भाषा वापरली ती योग्य होती का हा प्रश्न आहेच, मात्र माझी त्यांच्याबद्दल तक्रार नाही. त्यांच्या मागे कोण आहे हे शोधावंच लागेल, असं फडणवीस म्हणाले.

'पोलिसांच्या लाठीमारामुळं आंतरवाली सराटीत दगडफेक झाली असं सांगितलं जात आहे. ते एक कारण असेलच, पण पोलिसांवर ती वेळ का आली? आता हे षडयंत्र बाहेर येतंय. दगडफेक करणारे आरोपीच आता दगडफेकीचे आदेश देणाऱ्यांची नावं सांगत आहेत. रात्रीच्या अंधारात मनोज जरांगे यांच्या घरी जाणारे कोण आहेत? कोणाच्या घरी बैठक झाली? तिथं दगडफेकीचे आदेश देण्यात आले, असं फडणवीस म्हणाले.

‘मराठा समाजानं याआधी काढलेले मोर्चे हे शांततेच झाले होते. पण आताचं आंदोलन शांततेनं झालेलं नाही. समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजकारण केलं जात आहे. जरांगेंबरोबर कोण लोक दिसतायत? कोणासोबत फोटो येतायत? कोणाचे पैसे येतायत हे सगळं बाहेर येतंय. जरांगे पाटील यांचा 'बोलविता धनी' शोधून काढायचा आहे. वॉररूम कोणी उघडल्या? संभाजीनगर, पुणे, नवी मुंबईला कोणी उघडली हे सगळं माहीत आहे. संपूर्ण चौकशी केली जाईल,' असं फडणवीस यांनी सांगितलं.

WhatsApp channel