मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger Stocks : आरारारा खतरनाक... 'या' कंपनीच्या शेअरनं दहा वर्षांत दिला २४ हजार टक्के नफा

Multibagger Stocks : आरारारा खतरनाक... 'या' कंपनीच्या शेअरनं दहा वर्षांत दिला २४ हजार टक्के नफा

Apr 03, 2023, 06:14 PM IST

  • KEI industries Share Price : वायर बनवणाऱ्या एका कंपनीनं तिच्या गुंतवणूकदारांना अक्षरश: मालामाल करून टाकलं आहे. 

KEI Industries

KEI industries Share Price : वायर बनवणाऱ्या एका कंपनीनं तिच्या गुंतवणूकदारांना अक्षरश: मालामाल करून टाकलं आहे.

  • KEI industries Share Price : वायर बनवणाऱ्या एका कंपनीनं तिच्या गुंतवणूकदारांना अक्षरश: मालामाल करून टाकलं आहे. 

KEI industries Share Price : शेअर बाजारातील गुंतवणुकीची ताकद काय आहे याचा अनुभव दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना अनेकदा येत असतो. अर्थात, त्यासाठी संयम मात्र हवा. असा संयम बाळगणाऱ्या केईआय इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांना छप्परफाड फायदा झाला आहे. अवघ्या दहा वर्षांत या कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल २४ हजार टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

केईआय इंडस्ट्रीज ही कंपनी होम वायर आणि हाय व्होल्टेज वायर बनवते. अवघ्या दहा वर्षांच्या कालावधीत या कंपनीचे शेअर्स ७ रुपयांवरून १७०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्च पातळी १,७४४ रुपये आहे, तर ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १०४० रुपये आहे.

१६ ऑगस्ट २०१३ रोजी केईआय इंडस्ट्रीजचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर ७ रुपयांवर व्यवहार करत होते. आजच्या घडीला म्हणजेच, ३ एप्रिल २०२३ रोजी BSE वर हा शेअर १,६९६ च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. KEI इंडस्ट्रीजच्या समभागांनी १० वर्षांपेक्षा कमी कालावधीत २४,१२५ टक्के परतावा दिला आहे. १६ ऑगस्ट २०१३ रोजी ज्यांनी १ लाख रुपये गुंतवून कंपनीचे शेअर्स विकत घेतले असतील, त्यांच्या शेअर्सचे आजचे मूल्य २.२४ कोटी रुपये झालेले असेल. हल्ली मुदत ठेवींचे पैसे डबल होण्यासाठी आठ-आठ वर्षे वाट पाहावी लागते. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातून मिळणारा हा नफा डोळे दिपवून टाकणारा आहे.

मागच्या तीन वर्षांत ४७० टक्क्यांनी वाढला शेअरचा भाव

केईआय इंडस्ट्रीजच्या समभागांनी गेल्या ३ वर्षांत जोरदार परतावा दिला आहे. ३ एप्रिल २०२० रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर कंपनीच्या शेअरचा भाव २९५.८० रुपये होता. आज ३ एप्रिल २०२३ रोजी हाच शेअर १,६९६ रुपयांवर ट्रेड करत आहे. त्यामुळं एखाद्यानं तीन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर आजच्या घडीला त्या एक लाखाचे मूल्य ५.७३ लाख रुपये झाले असते. केईआय इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल १५,२७२ कोटी रुपये आहे. डिसेंबर २०२२ च्या तिमाहीत कंपनीचा महसूल १७८४.३२ कोटी रुपये होता. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीला १२८.६१ कोटी रुपयांचा तिमाही नफा झाला होता.

पुढील बातम्या