मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata Stocks : टाटाच्या या शेअर्समध्ये ६ हजार टक्के वाढ, १ लाखाचे झाले १ कोटी, तुमच्याकडे आहे का?

Tata Stocks : टाटाच्या या शेअर्समध्ये ६ हजार टक्के वाढ, १ लाखाचे झाले १ कोटी, तुमच्याकडे आहे का?

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 03, 2023 04:14 PM IST

Tata Stocks : आयटी इंडस्ट्रीशी संलग्न असलेली टाटा समूहातील या कंपनीच्या शेअर्सनी गेल्या १० वर्षात गुंतवणूकदारांना ६००० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे.

tata HT
tata HT

Tata Stocks : आयटी इंडस्ट्रीशी संलग्न असलेली टाटा समूहातील कंपनी टाटा एलेक्सीने गेल्या १० वर्षात गुंतवणूकदारांना ६००० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. टाटा एलेक्सीच्या शेअर या कालावधीत ९६ रुपयांनी वाढून ६००० रुपयांवर पोहोचला आहे. टाटा एलेक्सीने आपल्या शेअर होल्डर्सना एकदा बोनस शेअर्स दिले आहेत. टाटा एलेक्सीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यातील उच्चांक १०७६०.४० रुपये आहे. तर ५२ आठवड्यातील निचांकी भाव हा अंदाजे ५७०८.१० रुपये आहे.

१ लाखाचे १ कोटी असे झाले

मल्टिबॅगर टाटा एलेक्सीचे शेअर्स १३ एप्रिल २०१३ ला मुंबई स्टाॅक्स एक्सेंजवर ९६ रुपयांच्या पातळीवर होते. जर तेंव्हा एखाद्या व्यक्तीने १ लाखांची गुंतवणूक केली असेल तर त्याला १०४१ शेअर्स मिळाले असतील. टाटा एलेक्सीने सप्टेंबर २०१७ ला १ : १ असा बोनस शेअर दिला आहे. बोनस मिळाल्यानंतर शेअर्सची संख्या २०८२ झाली असेल. टाटा एलेक्सीचे शेअर्स ३१ मार्च २०२३ ला ५९६१.५० रुपयांवर बंद झाले. .याचप्रमाणे आज या शेअर्सचे मूल्य १ कोटींच्या घरात गेले आहे.

३ वर्षात ८०० टक्के उसळी

टाटा एलेक्सीच्या शेअर्समध्ये ३ वर्षात ८०० टक्के उसळी आली आहे. टाटा एलेक्सीचा शेअर्स २७ मार्च २०२० ला बीएसईवर ६३९.८५ रुपयांच्या पातळीवर होता. टाटा समूहातील या शेअरने गेल्या ३ वर्षात गुंतवणूकदारांना ८३१ टक्के रिटर्न्स दिले आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग