मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPOs This Week : शेअर बाजारासाठी वर्षाचा शेवटचा आठवडा धामधुमीचा; येतायत ६ नवे आयपीओ

IPOs This Week : शेअर बाजारासाठी वर्षाचा शेवटचा आठवडा धामधुमीचा; येतायत ६ नवे आयपीओ

Dec 25, 2023, 02:09 PM IST

  • IPOs This Week : २०२३ या वर्षांत अनेक नव्या कंपन्या शेअर बाजारात उतरल्या. या वर्षाचा शेवटचा आठवडाही यास अपवाद नसून या आठवड्यात तब्बल ६ कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुले होत आहेत.

IPO News

IPOs This Week : २०२३ या वर्षांत अनेक नव्या कंपन्या शेअर बाजारात उतरल्या. या वर्षाचा शेवटचा आठवडाही यास अपवाद नसून या आठवड्यात तब्बल ६ कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुले होत आहेत.

  • IPOs This Week : २०२३ या वर्षांत अनेक नव्या कंपन्या शेअर बाजारात उतरल्या. या वर्षाचा शेवटचा आठवडाही यास अपवाद नसून या आठवड्यात तब्बल ६ कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुले होत आहेत.

IPO News : शेअर बाजारातील आयपीओयचं वर्ष म्हणून ओळखल्या गेलेल्या २०२३ चा शेवटचा आठवडाही भरगच्च असणार आहे. आजपासून सुरू झालेल्या या आठवड्यात तब्बल ६ कंपन्यांचे आयपीओ दाखल होणार आहेत. त्याचबरोबर काही कंपन्यांचे शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

यंदाच्या वर्षात आयपीओ घेऊन आलेल्या लघु व मध्यम उद्योगांना गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. किरकोळ आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपपीओंमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. त्यामुळं अनेक आयपीओंचे सबस्क्रिप्शन अनेक पटींनी झालं. हे शेअर बाजारात वधारून लिस्ट झाले आणि त्यांनी गुंतवणूकदारांनाही चांगला फायदा दिला.

Paytm layoffs : पेटीएमनं १००० लोकांना नोकरीवरून काढलं! कारण ऐकून तुमचंही टेन्शन वाढेल

यंदाच्या वर्षातील शेवटच्या आठवड्यात आणखी सहा एसएमई कंपन्या निधी उभारणार आहेत, तर १० कंपन्यांचे शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहेत.

एआयके पाईप्स अँड पॉलिमर्स

एआयके पाइप्स अँड पॉलिमर्सचा आयपीओ २६ डिसेंबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार असून तो २८ डिसेंबरपर्यंत त्यासाठी अर्ज करता येईल. नवे इक्विटी शेअर बाजारात आणून १५ कोटी रुपये उभारण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी ८९ रुपये प्रति शेअर हा दर निश्चित करण्यात आला आहे. शेअरचं दर्शनी मूल्य प्रत्येकी १० रुपये आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी निव्वळ ऑफरच्या ५० टक्के कोटा निश्चित करण्यात आला आहे.

आकांक्षा पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर

आकांक्षा पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चरचा आयपीओ २७ डिसेंबरला सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार असून तो शुक्रवार, २९ डिसेंबरपर्यंत खुला असेल. कंपनीनं २७.४९ कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवले आहे. आयपीओद्वारे ४९.९८ लाख शेअर्स इश्यू करण्यात येणार आहेत. त्यासाठी ५२ ते ५५ रुपये हा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

एचआरएच नेक्स्ट

या कंपनीचा आयपीओ २७ ते २९ डिसेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. या ऑफरसाठी ३६ रुपये प्रति इक्विटी शेअर हा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. नवीन इक्विटी शेअर्स जारी करून ९.५७ कोटी रुपये उभे करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे.

मनोज सिरॅमिक

मनोज सिरॅमिक कंपनीचा आयपीओ २७ डिसेंबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल आणि २९ डिसेंबरपर्यंत खुला राहील. नवीन इक्विटी शेअर्स जारी करून १४.४७ कोटी रुपये उभे करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी ६२ रुपये प्रति इक्विटी शेअर हा दर निश्चित करण्यात आला आहे. 

aadhaar : नवं आधारकार्ड बनवणं आता सोपं नाही, पासपोर्टसारखं व्हेरिफिकेशन होणार; 'इतके' महिने लागणार!

श्री बालाजी व्हॉल्व्ह कम्पोनन्ट्स

या कंपनीचा आयपीओ २७ डिसेंबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल आणि २९ डिसेंबरपर्यंत खुला राहील. नवीन इक्विटी शेअर्स जारी करून २१.६० कोटी रुपये उभे करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. आयपीओसाठी ९५ ते १०० रुपये प्रति इक्विटी शेअर हा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. 

के सी एनर्जी अँड इन्फ्रा

के सी एनर्जी अँड इन्फ्राचा आयपीओ २८ डिसेंबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल आणि मंगळवार, २ जानेवारी खुला राहील. नवीन इक्विटी शेअर्स जारी करून १५.९३ कोटी रुपये उभे करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. आयपीओचा दरपट्टा ५१ ते ५४ रुपये प्रति शेअर असा आहे. 

नवी लिस्टिंग

या आठवड्यात शेअर बाजार १० कंपन्यांच्या शानदार पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. यापैकी काही कंपन्यांच्या सब्सक्रिप्शनला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळं त्या गुंतवणूकदारांना सरतं आणि नवं, ही दोन्ही वर्ष गोड करू शकतात, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.

 

(डिस्क्लेमर: या लेखात दिलेली मतं आणि शिफारशी बाजार तज्ज्ञांच्या आहेत. ही हिंदुस्तान टाइम्स मराठीची मतं नाहीत. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखमी असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या