Paytm layoffs : पेटीएमनं १००० लोकांना नोकरीवरून काढलं! कारण ऐकून तुमचंही टेन्शन वाढेल
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Paytm layoffs : पेटीएमनं १००० लोकांना नोकरीवरून काढलं! कारण ऐकून तुमचंही टेन्शन वाढेल

Paytm layoffs : पेटीएमनं १००० लोकांना नोकरीवरून काढलं! कारण ऐकून तुमचंही टेन्शन वाढेल

Dec 25, 2023 01:22 PM IST

One 97 Communications layoffs : फिनटेक क्षेत्रातील मोठी कंपनी पेटीएमनं आपल्या १ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचं वृत्त आहे.

Paytm Layoffs
Paytm Layoffs

Paytm Layoffs : वर्ष संपता-संपता फिनटेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी पेटीएमनं आपल्या कर्मचाऱ्यांना झटका दिला आहे. या कंपनीनं तब्बल १००० लोकांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर करून खर्चात कपात करण्याची कंपनीची योजना आहे. ही नोकरकपात त्याचाच भाग असल्याचं बोललं जात आहे.

पेटीएमनं अद्याप या नोकरकपाती बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सूत्रांच्या हवाल्यानं 'इकॉनॉमिक्स टाइम्स'नं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. या माहितीनुसार, नोकर कपातीची ही प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं ही वेळ आल्याचं सांगितलं जात आहे. या नोकरकपातीमुळं पेटीएममधील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या थेट १० टक्क्यांनी कमी होणार आहे. अलीकडं शेअर चॅटनं देखील २०० हून अधिक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता.

Aadhar: नवं आधारकार्ड बनवणं आता सोपं नाही, पासपोर्टसारखं व्हेरिफिकेशन होणार; 'इतके' महिने लागणार!

एआय करणार काम

पेटीएमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांवर केल्या जाणाऱ्या खर्चात आणखी १० ते १५ टक्क्यांची कपात करण्याची कंपनीची योजना आहे. पेटीएमनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं एआय ऑटोमेशनद्वारे करता येणार्‍या बहुतांश नोकऱ्यांवर परिणाम झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. भविष्यात एआयचा वापर वाढत गेल्यास आणखीही नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे.

लाँग हाऊस कन्सल्टिंगच्या अहवालानुसार, या वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत नव्या कंपन्यांनी २८ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. पेटीएममधील बहुतांश नोकरकपात ही कर्ज वितरण विभागातील आहे. सध्या कंपनी आपला तोटा कमी करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. 

ITR Form news : इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्ममध्ये बदल; सर्व बँक खाती व रोख रकमेची माहिती द्यावी लागणार

लहान कर्जांवरील निर्बंधांचा फटका

कर्ज वितरण कंपनी म्हणून विजय शंकर यांनी 'पेटीएम पोस्टपेड'ची स्थापना केली होती. सुरुवातीला ५० हजार रुपयांपर्यंतचं कर्ज झपाट्यानं वितरित करण्यात आलं. मात्र, आरबीआयनं छोट्या कर्जांच्या वितरणावर निर्बंध घातल्यामुळं पेटीएमनं ट्रॅक बदलला आहे. कंपनीनं आता संपत्तीचं व्यवस्थापन सुरू केलं असून कंपनीला विमा ब्रोकिंग कंपनी बनवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातं.

या विभागात होऊ शकते भरती

पेटीएमचं लक्ष सध्या संपत्ती व्यवस्थापन आणि विमा क्षेत्रांवर आहे. कंपनी इथं मजबूत व्यवसाय उभारण्याचा विचार करत आहे. त्यामुळं पुढील काळात अनेक नवे रोजगार निर्माण होऊ शकतात, असंही बोललं जात आहे.

Whats_app_banner