मराठी बातम्या  /  बिझनेस  /  aadhaar : नवं आधारकार्ड बनवणं आता सोपं नाही, पासपोर्टसारखं व्हेरिफिकेशन होणार; 'इतके' महिने लागणार!

aadhaar : नवं आधारकार्ड बनवणं आता सोपं नाही, पासपोर्टसारखं व्हेरिफिकेशन होणार; 'इतके' महिने लागणार!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Dec 25, 2023 01:23 PM IST

Aadhar Card news updates : भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड महत्त्वाचे कागदपत्र आहे.

aadhar card HT
aadhar card HT

New Aadhar Rules Changed: आधारकार्ड संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मोदी सरकार आधार कार्डसाठी नवीन प्रणाली लागू करणार आहे. पहिल्यांदा आधार कार्ड तयार करणाऱ्या तरुणाईला आता पडताळणी प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे, जे पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेसारखे असेल. एसडीएम स्तरावरील अधिकाऱ्याच्या मान्यतेनंतरच नवीन आधार कार्ड जारी केले जाईल. त्याच्याशिवाय त्यांना आधार कार्ड मिळणार नाही. यापूर्वी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण पडताळणी करायचे.

ट्रेंडिंग न्यूज

 

१८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी नवीन व्यवस्था:

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यूआयडीएआयच्या नव्या निर्देशांनुसार, ही प्रक्रिया केवळ १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांसाठीच लागू होईल. आधार कार्ड बनल्यानंतर ते सामान्य प्रक्रियेनुसार सर्व प्रकारचे अपडेट्स देखील करू शकतील. त्याचबरोबर ज्यांचे आधार कार्ड आधीच बनले आहे, त्यांना या नवीन प्रणालीतून जावे लागणार नाही.

 

राज्य सरकारची परवानगी अनिवार्य:

सरकार अर्जाच्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी जिल्हा स्तरावर अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी आणि उपविभाग स्तरावर एसडीएम यांना नामनिर्देशित करेल. या नियुक्त अधिकाऱ्यांकडून पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच कार्ड जारी केले जातील. प्रत्यक्ष पडताळणीसाठी जिल्हा मुख्य पोस्ट ऑफिस आणि इतर आधार केंद्रांची निवड केली जाईल.

 

नव्या आधारकार्डसाठी १८० दिवस लागण्याची शक्यता:

नव्या प्रणालीनुसार, नवीन आधार बनवण्यासाठी १८० दिवस लागू शकतात. या अंतर्गत आधार नोंदणी केल्यानंतर यूआयडीएआय डेटा गुणवत्ता तपासेल आणि त्यानंतर सर्व्हिस प्लस पोर्टलवर अर्ज पाठवेल. एसडीएम पोर्टलवर प्राप्त झालेले अर्ज सत्यापित करतील. अर्जदाराने सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल. यानंतर एसडीएम स्तरावरून आधार जारी करण्याची परवानगी दिली जाईल. कागदपत्रे संशयास्पद किंवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल.

अर्जदाराची उपस्थिती बंधनकारक:

अर्जदाराने प्रत्यक्ष पडताळणी करताना जागेवर उपस्थित राहणे बंधनकारक असेल. यासाठी इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राहणाऱ्या अर्जदारांना त्यांच्या मूळ राज्यात पडताळणीसाठी परत जाण्याचा सल्ला दिला जाईल.

WhatsApp channel

विभाग