मराठी बातम्या  /  बिझनेस  /  gold silver price : सोन्याची महागाई थांबेचना! तोळ्यामागे ७३ हजारांचा भाव, चांदीची चमकही वाढली

gold silver price : सोन्याची महागाई थांबेचना! तोळ्यामागे ७३ हजारांचा भाव, चांदीची चमकही वाढली

Apr 12, 2024, 03:11 PM IST

  • Gold Silver Price Today : सोन्या-चांदीची महागाई थांबण्याचा नावच घेत नसून आज सोने तब्बल ११२२ रुपयांनी महागलं आहे. तर, चांदीचा भाव किलोमागे ८४ हजारांवर गेला आहे.

सोन्याची महागाई थांबेचना! तोळ्यामागे ७३ हजारांचा भाव, चांदीची चमकही वाढली

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीची महागाई थांबण्याचा नावच घेत नसून आज सोने तब्बल ११२२ रुपयांनी महागलं आहे. तर, चांदीचा भाव किलोमागे ८४ हजारांवर गेला आहे.

  • Gold Silver Price Today : सोन्या-चांदीची महागाई थांबण्याचा नावच घेत नसून आज सोने तब्बल ११२२ रुपयांनी महागलं आहे. तर, चांदीचा भाव किलोमागे ८४ हजारांवर गेला आहे.

Gold Silver Price Today : ऐन लगीन सराईत सोने आणि चांदीचे दर नवनवे उच्चांक गाठत आहेत. सोन्याचा दर एका तोळ्यामागे जवळपास ७३ हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदीची चमकही सातत्यानं वाढत असून चांदी ८४ हजारांपर्यंत गेली आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) पाठोपाठ सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरानं उसळी घेतली आहे. आज, शुक्रवारी सोने प्रति १० ग्रॅम ११२२ रुपयांनी महागले आणि ७२,९६७ रुपयांचा नवा उच्चांक गाठला. तर, चांदीचा भाव १,२६२ रुपयांनी झेप घेत ८३,६०५ रुपयांवर पोहोचला आहे. एप्रिलमध्ये सोने तोळ्यामागे तब्बल ५,७१५ रुपयांनी महाग झालं आहे. तर, चांदीच्या दरात किलोमागे ९४७८ रुपयांची वाढ झाली आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या नव्या दरानुसार, आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ११४० रुपयांनी वाढून ७२६७५ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅममागे १०४८ रुपयांनी वाढून ६६,८३८ रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर, १८ कॅरेट सोन्याचा भाव आज ८५८ रुपयांनी वाढून ५४,७२५ रुपयांवर पोहोचला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ६६९ रुपयांनी वाढून ४२,६८६ रुपयांवर पोहोचला आहे. आयबीजेएचे हे दर विविध शहरांतील आहेत. तुमच्या शहरात सोन्या-चांदीच्या किमतीत १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.

सोन्याचा भाव ३ वर्षात २८,०४८ रुपयांनी वाढला

१ एप्रिल २०२१ रोजी सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत ४४९१९ रुपये होती. आज तो भाव ७२९६७ रुपयांवर पोहोचला आहे. तीन वर्षांत सोनं तोळ्यामागे २८,०४८ रुपये महागलं आहे. चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, या तीन वर्षात चांदीचा भाव ६३,७३७ रुपयांवरून ८३६०५ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच, चांदीच्या दरात १९८६८ रुपयांची वाढ झाली आहे.

मागच्या १५ दिवसांत पावणे सहा हजारांची वाढ

मागील महिन्यात २८ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ६७,२५२ या उच्चांकावर होता. त्यानंतर १ एप्रिलला त्यात आणखी वाढ होऊन तोळ्यामागे हा भाव ६८,९६४ रुपयांवर पोहोचला. नंतर ३ आणि ४ एप्रिलला त्यात आणखी वाढ होऊन हा भाव अनुक्रमे ६९,५२६ व ६९९३६ रुपये झाला. ८ एप्रिल रोजी सोन्याचा भाव ७१२७९ रुपये झाला तर, ९ एप्रिलला सोन्याच्या भावानं ७१५०७ पर्यंत झेप घेतली. आज हाच भाव ७२,९६७ वर पोहोचला आहे.

विभाग

पुढील बातम्या