मराठी बातम्या  /  बिझनेस  /  gold silver rate today : सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण, एका तोळ्याचा भाव किती? पाहा

gold silver rate today : सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण, एका तोळ्याचा भाव किती? पाहा

Mar 22, 2024, 03:01 PM IST

  • Gold Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वधारणाऱ्या सोने व चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे.

सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण, एका तोळ्याचा भाव किती? पाहा

Gold Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वधारणाऱ्या सोने व चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे.

  • Gold Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वधारणाऱ्या सोने व चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे.

Gold Silver Price Today : लगीनसराईमुळं मागचे काही दिवस सातत्यानं वधारणाऱ्या व नवा उच्चांक गाठणाऱ्या सोन्याच्या दरात आज (शुक्रवार, २२ मार्च) मोठी घसरण झाली. सोन्याच्या पाठोपाठ चांदीचा दरही घसरला. पाहूया काय आहेत आजचे दर… 

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

icici vs axis bank : आयसीआसीआय बँक की अ‍ॅक्सिस बँक? कोणता शेअर जास्त चांगला आणि का?

Income tax filing : पगारदार करदाते असाल तर 'या' पाच गोष्टी नीट लक्षात ठेवा, अन्यथा होईल मनस्ताप

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

२४ कॅरेट सोनं ६६९ रुपयांनी स्वस्त होऊन ६६,२४५ रुपयांवर आलं आहे. गुरुवारी हाच दर ६६,९६८ रुपये होता. आता २३ कॅरेट सोन्याची किंमत ६६६ रुपयांनी स्वस्त होऊन ६५,९८० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. 

२२ कॅरेट सोन्याचा भाव ६१३ रुपयांनी घसरून ६०६८० रुपयांवर आला आहे. १८ कॅरेटचा दर आता ४९,६८३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आज त्यात ५०३ रुपयांची घसरण झाली आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा दर ३९२ रुपयांनी कमी होऊन तोळ्यामागे ३८,७५३ रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदी किलोमागे १,२५८ रुपयांनी स्वस्त होऊन ७५,०४५ रुपये झाली आहे.

चालू महिन्यात अनेकदा गाठला उच्चांक

सोन्याच्या किंमतीनं मार्च महिन्यात ५ वेळा नवा उच्चांक गाठला. या महिन्यात ५ मार्च २०२४ रोजी सोन्याचा दर प्रथम ६४,५९८ रुपयांवर पोहोचला होता. दोन दिवसांनंतर ७ मार्चला तो ६५,०४९ रुपयांवर पोहोचला. त्यानंतर ११ मार्च रोजी १० ग्रॅम सोन्याचा भाव ६५,६४६ रुपये झाला. हा नवा उच्चांक होता. आज, २२ मार्चला हा दर ६६९६८ रुपयांवर पोहोचला होता.

मुंबईत सोने व चांदीचा आजचा भाव

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव तोळ्यामागे ६६,९३० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ६१,३५० रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा भाव ५०,१९० रुपये आहे. मुंबईत चांदीचा आजचा भाव किलोमागे ७६,५०० रुपये आहे.

सोन्या-चांदीचे हे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) जारी केले आहेत. या दरावर जीएसटी आणि दागिने बनवण्याचे शुल्क लागू नाही. त्यामुळं तुमच्या शहरात सोने-चांदी १००० ते २००० रुपयांनी महाग असण्याची शक्यता आहे. 

इंडियनं बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशन ही १०४ वर्षे जुनी संघटना आहे. IBJA दिवसातून दोनदा, दुपारी आणि संध्याकाळी सोन्याचे दर जाहीर करते. हे दर अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सार्वभौम रोखे जारी करण्यासाठी बेंचमार्क असतात. आयबीजेएची २९ राज्यांमध्ये कार्यालयं आहेत आणि ती सर्व सरकारी संस्थांचा भाग आहेत.

विभाग

पुढील बातम्या