31 March Deadline : ३१ मार्चच्या आधीच पूर्ण करा फास्टॅग केवायसीसह ही पाच महत्त्वाची कामे! नाहीतर…-before march 31 you should do important tasks like applying for fastag kyc updated itr tds filing gst composition ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  31 March Deadline : ३१ मार्चच्या आधीच पूर्ण करा फास्टॅग केवायसीसह ही पाच महत्त्वाची कामे! नाहीतर…

31 March Deadline : ३१ मार्चच्या आधीच पूर्ण करा फास्टॅग केवायसीसह ही पाच महत्त्वाची कामे! नाहीतर…

Mar 21, 2024 09:55 AM IST

Deadline 31 March : ३१ मार्चपूर्वी तुम्ही फास्टॅग केवायसीसाठी अर्ज करणे, आयटीआर अपडेट करणे, टीडीएस फाइलिंग, जीएसटी रचना यासारखी महत्त्वाची कामे करावी लागणार आहे.

 ३१ मार्चपूर्वी तुम्ही फास्टॅग केवायसीसाठी अर्ज करणे, आयटीआर अपडेट करणे, टीडीएस फाइलिंग, जीएसटी रचना यासारखी महत्त्वाची कामे करावी लागणार आहे.
३१ मार्चपूर्वी तुम्ही फास्टॅग केवायसीसाठी अर्ज करणे, आयटीआर अपडेट करणे, टीडीएस फाइलिंग, जीएसटी रचना यासारखी महत्त्वाची कामे करावी लागणार आहे.

Deadline 31 March : मार्च महिना संपत्त आला आहे. या सोबतच आर्थिक वर्ष २०२३-२४ देखील संपत आले आहे. आज २१ मार्च तारीख असून पुढील १० दिवसांत तुम्हाला आर्थिक व्यवहाराशी निगडीत महत्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहे. आर्थिक वर्ष मार्चमध्ये संपत असल्याने अनेक कामांचा हिशेब पूर्ण करावा लागतो. यामुळे बँक कर्मचाऱ्यांची आणि वापऱ्यांची गडबड तुम्ही पाहत असाल. यामुळे ३१ मार्चपूर्वी तुम्हाला फास्टॅग केवायसी, अपडेटेड आयटीआर, टीडीएस फाइलिंग, जीएसटी कंपोझिशन यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीची रखडलेली कामे ही तातडीने पूर्ण कारवाई लागणार आहे. तर तुम्ही या गोष्टी केल्या नाही तर तुम्हाला मोठा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

फास्टॅग वापरकर्त्यांसाठी ३१ मार्च केवायसी अपडेट करण्याचा शेवटचा दिवस आहे. NHAI ने Fastag चे KYC अपडेट करण्याची मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत २९ फेब्रुवारी होती. त्यामुळे तुमच्या फास्टॅग कंपनीनुसार, तुम्ही नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनच्या वेबसाइटवर किंवा इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या पोर्टलला भेट देऊन तुमच्या फास्टॅगचे केवायसी तपशील अपडेट करू शकता. हे केवायसी तुम्ही अपडेट न केल्यास तुमचे फास्टॅग खाते १ एप्रिलपासून अवैध होणार आणि याचा आर्थिक भुर्दंड तुम्हाला होऊ शकतो.

२. कर वाचवण्यासाठी गुंतवणूक

आयकर रिटर्न भरण्याचा कालावधीही एप्रिलपासून सुरू होणार आहे. जर तुम्ही २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी जुन्या कर योजनेत रिटर्न भरत असाल तर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा दावा देखील करू शकता. जर तुम्ही यापूर्वी कर बचतीच्या वस्तूंमध्ये गुंतवणूक केली नसेल, तर तुम्ही ३१ मार्चपूर्वी त्यामध्ये गुंतवणूक करून आयकर वाचवू शकता. कलम ८० सी अंतर्गत, सरकार ने आयकर वाचवण्यासाठी अनेक गुंतवणूक विशेष पर्याय दिले आहेत, जे आयकर वाचवण्याची संधी देतात, जसे की सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम, सुकन्या समृद्धी, मुदत ठेव, NPS आणि इतर पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे.

जर तुम्ही PPF मध्ये म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि सुकन्या समृद्धीसह इतर अशा सरकारी समर्थित योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुमच्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात त्या खात्यात किमान रक्कम जमा करणे अनिवार्य आहे. तुम्हाला पीपीएफमध्ये वर्षभरात किमान ५०० रुपये आणि सुकन्या समृद्धी योजनेत २५० रुपयांपर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास, तुमचे खाते डीफॉल्ट घोषित केले जाऊ शकते आणि तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

४ . स्त्रोतावर कर भरणे

प्राप्तिकरदात्यांना मार्चमध्ये TDS दाखल करण्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. जानेवारी २०२४ साठी वेगवेगळ्या कलमांतर्गत मिळणाऱ्या कर सूटसाठी. कलम १९४-IM, १९४IB आणि १९४M अंतर्गत कर कपात केली असल्यास, ३० मार्चपूर्वी त्याचे चालान विवरण दाखल करावे लागणार आहे.

५. जीएसटी रचना योजना

विद्यमान जीएसटी करदाते २०२४-२५ या आर्थिक वर्षातील रचना योजनेसाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. विशिष्ट उलाढाल असलेले पात्र व्यावसायिक करदाते या योजनेसाठी अर्ज करू शकतात, जी अधिक सोपी कर योजना आहे. यासाठी त्यांना सीएमपी ०२ फॉर्म भरावा लागेल. जीएसटी करदाते ज्यांची वार्षिक उलाढाल १.५ कोटी रुपये आहे, ते या अंतर्गत अर्ज करू शकतात. काही विशिष्ट योजनांतर्गत ते १५ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. रेस्टॉरंटसाठी ते १.५ कोटी रुपये, तर इतर सेवा पुरवठादारांसाठी ही अट ५० लाख रुपये आहे.

Whats_app_banner
विभाग