मराठी बातम्या  /  बिझनेस  /  WhatsApp: टाइप न करता पाठवा मॅसेज; अँड्रॉईड युजर्ससाठी व्हॉट्सॲप आणतंय भन्नाट फीचर!

WhatsApp: टाइप न करता पाठवा मॅसेज; अँड्रॉईड युजर्ससाठी व्हॉट्सॲप आणतंय भन्नाट फीचर!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 20, 2024 08:55 PM IST

गेल्या वर्षी आयफोनसाठी व्हॉट्सॲपवर पदार्पण केल्यानंतर व्हॉट्सॲप अँड्रॉइड युजर्ससाठी व्हॉईस ट्रान्सक्रिप्शन फीचर आणणार आहे. जाणून घ्या या आगामी फीचरबद्दल.

व्हॉट्सॲप अँड्रॉईड युजर्ससाठी व्हॉइस ट्रान्सक्रिप्शन नावाचे फीचर घेऊन येत आहे.
व्हॉट्सॲप अँड्रॉईड युजर्ससाठी व्हॉइस ट्रान्सक्रिप्शन नावाचे फीचर घेऊन येत आहे. (Bloomberg)

व्हॉट्सॲप नेहमी वापरकर्त्यांसाठी सतत नवीन फीचर्स घेऊन येत असते. यातच व्हॉट्सॲप अँड्रॉईड युजर्ससाठी नवीन धमाकेदार फीचर घेऊन येत आहे. या नव्या फीचर्समुळे वापरकर्त्यांना मॅसेज पाठवण्यासाठी टाइप करण्याची आवश्यकता लागणार आहे. कारण, वापरकर्त्यांना व्हॉईस मेसेजला मजकुरात रूपांतरित करण्याची सुविधा मिळणार आहे. या फीचरला व्हॉट्सॲपने व्हॉइस ट्रान्सक्रिप्शन असे नाव दिले आहे.

व्हॉट्सॲपमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग नावाची सुविधा मिळते. पंरतु, अनेकदा रेकॉर्डिंग पाठवताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे वापरकर्त्यांचा मॅसेज व्यवस्थितपणे त्यांच्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही. परंतु, व्हॉट्सॲपच्या व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्शन फीचर्समुळे अशाप्रकारचे कोणतेही अडथळे येणार नाहीत. कारण, व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्शन व्हॉईस मेसेजला मजकुरात रुपांतरीत करतो. यामुळे वापरकर्ते मॅसेज वाचून समजून घेऊ शकतात.

व्हॉट्सॲपचे हे फीचर्स नेमके कधी लॉन्च होईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्शनची जोड दिल्यास व्हॉट्सअॅपची सुलभता आणि उपयुक्तता वाढेल. यामुळे व्हॉट्सॲपमध्ये वेगवेगळ्या अडचणीत या फीचर्सद्वारे समोरच्या व्यक्तीशी संवाद साधू शकतात.

WhatsApp channel

विभाग