मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Small Saving Scheme : पीपीएफ, सुकन्या सारख्या अल्पबचत योजनांवरील व्याजदर वाढण्याची शक्यता

Small Saving Scheme : पीपीएफ, सुकन्या सारख्या अल्पबचत योजनांवरील व्याजदर वाढण्याची शक्यता

Dec 29, 2023, 10:56 AM IST

  • Small Saving Schemes Interest Rates : नव्या वर्षात छोट्या गुंतवणूकदारांना व्याजदर वाढीची खूशखबर मिळण्याची शक्यता आहे.

Small Saving Schemes

Small Saving Schemes Interest Rates : नव्या वर्षात छोट्या गुंतवणूकदारांना व्याजदर वाढीची खूशखबर मिळण्याची शक्यता आहे.

  • Small Saving Schemes Interest Rates : नव्या वर्षात छोट्या गुंतवणूकदारांना व्याजदर वाढीची खूशखबर मिळण्याची शक्यता आहे.

Small Saving Scheme Interest Rates : अल्पबचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांना नव्या वर्षात आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत आहेत. केंद्र सरकार अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४च्या चौथ्या तिमाहीतील व्याजदरांच्या फेरआढाव्यानंतर हा निर्णय होऊ शकतो. वाढीव व्याजदर १ जानेवारी २०२४ पासून लागू होतील.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

सरकार दर तीन महिन्यांनी लहान बचत योजनांच्या व्याजदरांचा फेरआढावा घेते. याआधी ३० सप्टेंबर रोजी दोन योजनांवर व्याजदर वाढवण्यात आले होते. अन्य योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. त्यामुळं आता उर्वरित योजनांच्या वाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Oneplus Nord 3 5G: वनप्लस नॉर्ड ३ 5G च्या किंमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवी किंमत आणि फीचर्स!

हे व्याजदर जैसे थे आहेत!

केंद्र सरकारकडून पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत खाते, राष्ट्रीय प्रमाणपत्रासह एकूण १२ प्रकारच्या अल्पबचत योजना चालविल्या जातात. गेल्या वेळी यापैकी बहुतेक बचत योजनांच्या व्याजदर बदल करण्यात आला नव्हता. केवळ पाच वर्षांच्या आवर्ती ठेव योजनेचा (RD) व्याजदर ६.५ वरून ६.७ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता.

पीपीएफचे दर तीन वर्षांपासून जैसे थे

१ एप्रिल २०२० च्या आधी देशात पीपीएफवर ७.१० टक्के व्याजदर होता. कोरोनाच्या काळात, सरकारनं एप्रिल ते सप्टेंबर २०२० या तिमाहीत अनेक बचत योजनांचे व्याजदर बदलून ते कमी केले होते. तेव्हापासून पीपीएफचा व्याजदर ७.१० टक्के आहे. मधल्या काळात व्याजदरात बदल झाले. मात्र, पीपीएफमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळं यावेळी पीपीएफच्या व्याजदरात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

कोण घेतं निर्णय?

केंद्रीय अर्थ मंत्रालय दर तिमाहीला अल्प बचत योजनांचे दर जाहीर करते. बँक एफडीवरील दर रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटच्या आधारे ठरतात. लहान बचत योजनांचा उद्देश सामान्य लोकांना बचत करण्यास प्रोत्साहित करणं हा आहे. मासिक उत्पन्न योजना आणि ज्येष्ठ नागरिक ठेव योजनेद्वारे नियमित कमाईचा स्रोत निर्माण करणं हा उद्देश आहे.

Multibagger Stock : शेअरनं कमाल केली! १०,००० रुपयांचे तीन वर्षांत झाले सहा लाख

खालील योजनांच्या व्याज दरात वाढीची शक्यता (सध्याचे दर)

बचत ठेव योजना: ४.० टक्के

१ वर्षाची मुदत ठेव: ६.९ टक्के

५ वर्षांची मुदत ठेव: ७.५ टक्के

५ वर्षांची आवर्ती ठेव योजना: ६.७ टक्के

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना: ७.७ टक्के

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना: ७.१ टक्के

किसान विकास पत्र: ७.५ टक्के

सुकन्या समृद्धी खाते योजना: ८. टक्के

पुढील बातम्या