Oneplus Nord 3 5G: वनप्लस नॉर्ड ३ 5G च्या किंमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवी किंमत आणि फीचर्स!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Oneplus Nord 3 5G: वनप्लस नॉर्ड ३ 5G च्या किंमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवी किंमत आणि फीचर्स!

Oneplus Nord 3 5G: वनप्लस नॉर्ड ३ 5G च्या किंमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवी किंमत आणि फीचर्स!

Published Dec 28, 2023 09:57 PM IST

OnePlus Nord 3 Price Drops: वनप्लस नॉर्ड ३ 5G च्या किंमतीत ४ हजाराची कपात करण्यात आली.

OnePlus Nord 3 5G
OnePlus Nord 3 5G

OnePlus Nord 3 Price Cut: स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने त्यांचा स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड ३ च्या किंमतीत घट केली आहे. हा स्मार्टफोन यावर्षी जुलै महिन्यात बाजारात आला होता. हा मिडरेंज स्मार्टफोन आहे, जो दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला. फोनच्या दोन्ही व्हेरिएंटच्या किंमतीत ४ हजार रुपयांची कपात करण्यात आली. या फोनची नवीन किंमत आणि फीचर्सबाबत जाणून घेऊयात.

वनप्लस नॉर्ड ३ हा फोन ८ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज आणि १६ जीबी रॅम/२५६ जीबी या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च झाला होता. दरम्यान, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत ३३ हजार ९९९ रुपये आहे. तर, १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीत कपाती केल्यानंतर ८ जीबी रॅम आणि १२८ स्टोरेज असलेला स्मार्टफोन २९ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. तर, १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोन ३३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. हा स्मार्टफोन मिस्टी ग्रीन आणि टेम्पेस्ट ग्रे अशा दोन पर्यायांमध्ये येतो. याशिवाय, आयसीआयसीआय बँकच्या ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर अतिरिक्त दोन हजारांचे प्लॅट डिस्काऊंट मिळत आहे.

या फोनमध्ये ६.७४ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळत आहे. हा फोन ऑक्टा-कोर डायमेंसिटी 9000 4nm प्रोसेसर आणि Mali-G710 10-कोर GPU द्वारे समर्थित आहे. हा फोन १६ जीबी रॅम आणि २५६ स्टोरेजसह येतो. या फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे, जे ८० वॅट चार्चिंगला सपोर्ट करते.

फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे, ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी ग्राहकांना १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. या फोनमध्ये अलर्ट स्लाइडर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, डॉल्बी अॅटमॉससह अपग्रेड केलेले स्टीरिओ स्पीकर आणि यूएसबी टाइप- सी ऑडिओ यांचा समावेश आहे.

Whats_app_banner