मराठी बातम्या  /  बिझनेस  /  EPFO : महत्त्वाची बातमी ! ईपीएफओ कर्मचाऱ्यांना मिळणार जास्त निवृत्तीवेतन, प्रक्रिया सुरु

EPFO : महत्त्वाची बातमी ! ईपीएफओ कर्मचाऱ्यांना मिळणार जास्त निवृत्तीवेतन, प्रक्रिया सुरु

Feb 21, 2023, 09:59 AM IST

    • EPFO :   ईपीएफओ कर्मचाऱ्यांना जास्त निवृत्तीवेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी २२ आॅगस्ट २०१४ ला ईपीएसने पेन्शन योग्य वेतन मर्यादा ६५०० रुपये प्रती महिना वाढवून १५ हजार प्रती महिना केली होती.
EPFO HT

EPFO : ईपीएफओ कर्मचाऱ्यांना जास्त निवृत्तीवेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी २२ आॅगस्ट २०१४ ला ईपीएसने पेन्शन योग्य वेतन मर्यादा ६५०० रुपये प्रती महिना वाढवून १५ हजार प्रती महिना केली होती.

    • EPFO :   ईपीएफओ कर्मचाऱ्यांना जास्त निवृत्तीवेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी २२ आॅगस्ट २०१४ ला ईपीएसने पेन्शन योग्य वेतन मर्यादा ६५०० रुपये प्रती महिना वाढवून १५ हजार प्रती महिना केली होती.

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने सोमवारी कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) अंतर्गत अधिक पेन्शनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. निवृत्तीवेतन फंडाचे नियोजन करणाऱ्या संस्थेने सांगितले की, यासाठी सदस्य आणि सदस्य काम करत असलेली संस्था संयुक्तपणे अर्ज सादर करु शकतात. नोव्हेंबर २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी पेन्शन योजना २०१४ ला कायम ठेवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

याआधी २२ आॅगस्ट २०१४ ला ईपीएसने पेंन्शन योग्य वेतन सीमा ६५०० रुपये प्रती महिन्यावरुन १५००० रुपये प्रती महिना केली होती. त्यासह सदस्य आणि संस्थांना ईपीएसमध्ये त्यांच्या वेतनातील ८.३३ टक्के योगदान देण्याची अनुमती देण्यात आली होती. ईपीएफओने एका आदेशात फिल्ड कार्यालयांद्वारे संयुक्त विकल्प फाॅर्मसंदर्भात माहिती दिली आहे.

ईपीएफओने सांगितले की एक सुविधा देण्यात येईल. याची यूआरएल (युनिक रिसोर्स लोकेशन) देण्यात येईल. ती दिल्यानंतर क्षेत्रीय पीएफ आयुक्त व्यापक सार्वजनिक सूचनेसाठी नोटीसबोर्ड आणि बॅनरद्वारे माहिती देतील. आदेशानुसार, प्रत्येक अर्ज नोंदणीकृत केला जाणार आहे. डिजिटल रुपात लाॅग इन करण्यात येणार आहे आणि अर्जदाराला तशा आशयाचा पावती क्रमांक दिला जाईल.

संबंधित क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालयाचे प्रभारी अधिकारी उच्च वेतनावर संयुक्त विकल्पाच्या प्रत्येक प्रकरणाची चौकशी करतील. त्यानंतर अर्जदाराला ईमेल / पोस्टाद्वारे एसएमएसद्वारे निर्णय़ाची माहिती देण्यात येईल. आदेशानुसार, हे निर्देश म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या ४ नोव्हेंबर २०२२ च्या आदेशाचे पालन करण्याच्या दृष्टीने देण्यात आले आहेत.

विभाग

पुढील बातम्या