मराठी बातम्या  /  बिझनेस  /  EPFO : पीएफच्या खात्यात मिळेल जास्त व्याज ! ईपीएफओ बदलणार गुंतवणूक धोरण

EPFO : पीएफच्या खात्यात मिळेल जास्त व्याज ! ईपीएफओ बदलणार गुंतवणूक धोरण

Jan 19, 2023, 12:01 PM IST

    • EPFO :  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ग्राहकांना आगामी काळात अधिक व्याज मिळू शकते. ईपीएफओ आता अधिक परताव्यासाठी त्यांच्या गुंतवणुकीच्या धोरणात बदल करणार आहे.
EPFO HT

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ग्राहकांना आगामी काळात अधिक व्याज मिळू शकते. ईपीएफओ आता अधिक परताव्यासाठी त्यांच्या गुंतवणुकीच्या धोरणात बदल करणार आहे.

    • EPFO :  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ग्राहकांना आगामी काळात अधिक व्याज मिळू शकते. ईपीएफओ आता अधिक परताव्यासाठी त्यांच्या गुंतवणुकीच्या धोरणात बदल करणार आहे.

EPFO : इक्विटीमध्ये सध्या जास्त परतावा देत आहे. ईपीएफओने ईटीएफ रिडीम पॉलिसीला अधिक तर्कसंगत करण्यासाठी ईपीएफओने पावले उचलली आहेत. त्यानुसार ईटीएफ रिडीमसाठी १० टक्के रिटर्नची मर्यादा निर्धारित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

highest fd rates : 'या' चार बँका देतायत एफडीवर सर्वाधिक व्याज; तुमची एफडी कुठं आहे?

Stocks to buy : पुढच्या महिनाभरात १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात हे १० शेअर, तुमच्याकडं आहेत का?

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ग्राहकांना आगामी काळात अधिक व्याज मिळू शकते. ईपीएफओ आता अधिक परताव्यासाठी त्यांच्या गुंतवणुकीच्या धोरणात बदल करणार आहे. एक्सेंज ट्रेडेड फंडाच्या माध्यमातून इक्विटी गुंतवणूकीत प्राॅफिट बूकिंगसाठी १० टक्के रिटर्न सीमा निर्धारित करण्याचा प्रस्ताव लेखा परीक्षा समितीने दिला आहे. त्याशिवाय, शेअर बाजारात होणाऱ्या चढ उताराचा लाभ घेण्यासाठी ईटीएफमध्ये गुंतवण्यात आलेली रक्कम एकहाती काढण्याव्यतिरिक्त वारंवार काढण्याचीही सूचना यात केली आहे.

याचा अर्थ असा की, वार्षिक परतावा १०% किंवा त्याहून अधिक असेल तरच ईपीएफओ ईटीएफची पूर्तता करेल. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) मान्यता दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. ईपीएफओ संचालक मंडळाच्या सदस्यानेे दिलेल्या माहितीनुसार, यामुळे रिडीम पॉलिसीमध्ये पारदर्शकता येईल तसेच रिटर्न्समध्येही वाढ होईल. कर्ज आणि इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा इक्विटीमध्ये जास्त परतावा मिळत आहे. हे पाहता ईपीएफओ ​​आता आपले गुंतवणूक धोरण बदलत आहे. कामगार मंत्रालयानेही ईपीएफओशी सहमता दाखवली आहे.

१५ टक्के इक्विटी गुंतवणूक

ईपीएफओ त्याच्या एकूण निधीपैकी १५ टक्के रक्कम ईटीएफमध्ये गुंतवते. ईपीएफओने ईटीएफमधील गुंतवणुकीचा कालावधी ४ ऐवजी ५ वर्षांपर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ईपीएफओची योजना शेअर बाजारातील चढ-उतारातून चांगला परतावा मिळवण्याचा आहे. म्हणूनच ईटीएफमध्ये गुंतवलेले पैसे १०% किंवा त्याहून अधिक परतावा मिळाल्यावर एकरकमी रिडीम करण्याऐवजी दररोज रिडीम करावे लागतात.

पैसे काढण्याच्या धोरणात बदल

सध्या, ईपीएफओ ​​'फर्स्ट इन, फर्स्ट आउट' तत्त्वावर इक्विटी रिडीम करते. याचा अर्थ असा की पहिल्या वर्षी इक्विटीमध्ये गुंतवलेले पैसे चौथ्या वर्षी काढले जातात. जेणेकरून पैसे दीर्घकाळ गुंतवलेले राहतील आणि चांगला परतावा मिळू शकेल. ईपीएफओ सदस्यांना अधिक परतावा देण्यासाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे आता आवश्यक झाले आहे, असे कामगार मंत्रालयाचे मत आहे. कारण कर्ज आणि इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये परताव्याचा दर इक्विटीच्या तुलनेत घसरत आहे.

१.५ लाख कोटीची इक्विटीमध्ये वार्षिक गुंतवणूक

ईपीएफओने २०१५-१६ मध्ये इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. पहिल्या वर्षी ५ टक्के निधी, दुसऱ्या वर्षी १० टक्के रक्कम इक्विटीत गुंतवण्यात आली. यामुळे पुढील वर्षात फंडातील १५ टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवण्यात आली. एकूण १.७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक इक्विटीमध्ये करण्यात आली. यामध्ये ३१ मार्च २०२२ पर्यंत ईपीएफओ​​ने २२ हजार कोटी रुपये इक्विटीतून काढले होते. ईपीएफओ दरवर्षी शेअर बाजारात अंदाजे १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करते.

विभाग

पुढील बातम्या