मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Elon Musk Birthday : हॅप्पी बर्थ डे एलाॅन ! जगातल्या या अब्जाधीशाला कायमच का असते घाई, टाॅयलेटलाही जायलाही वेळ नाही

Elon Musk Birthday : हॅप्पी बर्थ डे एलाॅन ! जगातल्या या अब्जाधीशाला कायमच का असते घाई, टाॅयलेटलाही जायलाही वेळ नाही

Jun 28, 2023, 03:05 PM IST

    • Elon Musk Birthday : जगातील सर्वात मोठा अब्जाधीश असलेल्या एलॉन मस्कचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म २८ जून १९७१ रोजी झाला. व्यवसायाने अभियंता असलेला मस्क आज अनेक कंपन्या चालवत आहेत. तो आपल्या कामासाठी एक दिवसही सुट्टी का घेत नाहीत ते जाणून घ्या.
Elon musk HT

Elon Musk Birthday : जगातील सर्वात मोठा अब्जाधीश असलेल्या एलॉन मस्कचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म २८ जून १९७१ रोजी झाला. व्यवसायाने अभियंता असलेला मस्क आज अनेक कंपन्या चालवत आहेत. तो आपल्या कामासाठी एक दिवसही सुट्टी का घेत नाहीत ते जाणून घ्या.

    • Elon Musk Birthday : जगातील सर्वात मोठा अब्जाधीश असलेल्या एलॉन मस्कचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म २८ जून १९७१ रोजी झाला. व्यवसायाने अभियंता असलेला मस्क आज अनेक कंपन्या चालवत आहेत. तो आपल्या कामासाठी एक दिवसही सुट्टी का घेत नाहीत ते जाणून घ्या.

Elon Musk Birthday : जगातील सर्वात मोठे अब्जाधीश एलाॅन मस्कचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म २८ जून १९७१ रोजी दक्षिण आफ्रिकेत झाला. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार त्याची एकूण संपत्ती २२५ अब्ज डाॅलर्स आहे. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती ८८.४ अब्ज डाॅलर्सने वाढली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

मस्कची इलेक्ट्रिक कार बनवणारी टेस्ला ही जगातील सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी आहे. याशिवाय ट्विटर, स्पेस एक्स या बड्या कंपन्यांची मालकी त्याच्या नावावर आहे. त्याला कामाची प्रचंड आवड आहे. हीच बाब त्याला आपल्या कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित आहे. एलाॅनला सुट्टी अजिबात आवडत नाही. कारण एकदा सुट्ट्यांमुळे तो मृत्यू जवळ आला होता.

मस्कच्या सुट्टीचा रंजक किस्सा

मस्कने डिसेंबर २००० मध्ये अनेक वर्षांनतर पहिल्यांदा सुट्टी घेतली होती. तो आपल्या कुटूंबासोबत दोन आठवड्यांच्या सुट्टीवर गेला होता. पहिल्या टप्प्यात ब्राझील आणि दुसऱ्या टप्यात दक्षिण आफ्रिकेत गेला होता. आफ्रिकेत त्याला गंभीर स्वरुपाचा मलेरिया झाला. त्याची तब्येत खूप खालावली. आयसीयूमध्ये सलग दहा दिवस घालवल्यानंतर त्याला एका डाॅक्टरने बरे केले. काही दिवसानंतर तो डाॅक्टर मस्कला म्हणाला की, जर एक दिवसही उशीर झाला असता तर तुम्हाला वाचवणे कठीण झाले असते. मस्क म्हणाला की सुट्ट्यांच्या बाबतीत माझा अनुभव खराब आहे. सुट्ट्यामुळे तुमचे नुकसान होते.

मस्क आहे परफेक्टनिस्ट

मस्कला सतत कामात बिझी रहायला आवडते. हीच बाब तो त्याच्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडूनही अपेक्षित करतो. कर्मचाऱ्यांच्या छोट्याशा चूकीसाठी तो थेट ईमेल पाठवून घरचा रस्ता दाखवण्यासाठी तो बदनाम आहे. एलाॅनला वेळ वाया घालवलेला अजिबात आवडत नाही. मस्कसोबत सुरुवातीच्या काळात काम करणारे केविन ब्रोगन म्हणतात की, मस्क कायम घाईत असतो. टाॅयलेटमध्येही तो घाईत असतो. केवळ तीन सेकंदातच त्याचे काम पूर्ण होते. वेळेचं गणित कायम डोक्यात ठेवणाऱ्या मस्कच्या कार्यकुशलतेचे, यशाचं गमक हेच की वेळेचं योग्य नियोजन. म्हणूनच तो आज जगातील अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान आहे.

विभाग

पुढील बातम्या