मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PM Modi Met Elon Musk : "मी मोदींचा फॅन", एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

PM Modi Met Elon Musk : "मी मोदींचा फॅन", एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

Jun 21, 2023, 09:52 AM IST

    • PM Modi Met Elon Musk : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी मंगळवारी ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली. पुढील वर्षी मस्क भारत दौऱ्यावर येणार आहेत.
PM Modi Met Elon Musk

PM Modi Met Elon Musk : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी मंगळवारी ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली. पुढील वर्षी मस्क भारत दौऱ्यावर येणार आहेत.

    • PM Modi Met Elon Musk : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी मंगळवारी ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली. पुढील वर्षी मस्क भारत दौऱ्यावर येणार आहेत.

न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी रात्री ते न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या विशेष विमानाने उतरल्यानंतर त्यांनी तेथील विविध लोकांशी भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, मोदी यांनी काल टेस्लाचा आणि ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांची भेट घेतली. यावेळी ''मी पंतप्रधान मोदींचा चाहता आहे'', असे एलोन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत पोहचल्यावर विविध क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांच्या भेटी घेत आहेत. यामध्ये नोबेल पारितोषिक विजेते, अर्थशास्त्रज्ञ, कलाकार, शास्त्रज्ञ, विद्वान यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या सुरुवातीला टेस्लाचे सीईओ आणि ट्विटर सीईओ यांची भेट घेतली. बैठकीनंतर एलोन मस्क खूप आनंदी दिसत होते. ते म्हणाले, "मी मोदींचा चाहता आहे. पंतप्रधानांना भेटून खूप आनंद झाला," मस्क म्हणाले. मला मोदी खूप आवडतात. दरम्यान, दोघांमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाली. भारतात गुंतवणूक करण्याविषयी मुख्य चर्चा झाल्याचे समजते. टेस्लाचा भारतातील कारखाना कुठे उभारणार, यावर वर्षाअखेरीस अंतिम निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया मस्क यांनी दिली. मोदी हीरो आहेत, त्यांना भारतासाठी खूप काही करायचं आहे, त्यांच्याशी अतिशय व्यापक चर्चा झाली, असंही मस्क म्हणाले.

ट्विटरचे प्रमुख म्हणाले, "पंतप्रधान मोदींना खरोखर भारताची काळजी आहे. ते आम्हाला भारतात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आहेत. आम्हाला फक्त योग्य वेळ शोधावी लागेल. मोदी देशाच्या दुष्टिने योग्य गोष्टी करतात." त्यांना कंपन्यांसाठी मदत करायची आहे. "

पंतप्रधानांनी यापूर्वी २०१५ मध्ये कॅलिफोर्नियातील एलोन मस्कच्या टेस्ला मोटर्स कारखान्याला भेट दिली होती. त्यावेळी ते ट्विटरचे मालक नव्हते. इलॉन मस्कसोबत पंतप्रधानांची भेट अशा वेळी झाली जेव्हा टेस्ला भारतात आपला कारखाना सुरू करण्यासाठी जागा शोधत आहे.

इलॉन मस्क व्यतिरिक्त पीएम मोदींनी लेखक रॉबर्ट थर्मन आणि सांख्यिकीतज्ज्ञ निकोलस नसीम तालेब यांचीही भेट घेतली आहे.

विभाग

पुढील बातम्या