मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Elon Musk on Modi : एलाॅन मस्कने पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं का उधळली, त्यामागचं नेमकं कारण काय ? धक्कादाखल खुलासा

Elon Musk on Modi : एलाॅन मस्कने पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं का उधळली, त्यामागचं नेमकं कारण काय ? धक्कादाखल खुलासा

Jun 25, 2023, 08:07 AM IST

    • Elon Musk on Modi : पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात ते एलन मस्कसह अनेकांना भेटले. मस्कने तर मी मोदींचा फॅन असल्याचं म्हटलंय.
Elon Musk with PM Narendra Modi HT

Elon Musk on Modi : पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात ते एलन मस्कसह अनेकांना भेटले. मस्कने तर मी मोदींचा फॅन असल्याचं म्हटलंय.

    • Elon Musk on Modi : पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात ते एलन मस्कसह अनेकांना भेटले. मस्कने तर मी मोदींचा फॅन असल्याचं म्हटलंय.

Elon Musk on Modi : पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याची चर्चा सध्या सोशल नेटवर्किंगवर जोरदार सुरु आहे. पंतप्रधान मोदी आपल्या अमेरिकेतील दौऱ्यात एलाॅन मस्क, सुंदर पिचाई यांसह अनेक उद्योजकांना भेटले. पंतप्रधान मोदी आणि एलाॅन मस्क यांची भेट २१ जून रोजी झाली. आपल्या भेटीनंतर मी पंतप्रधान मोदींचा फॅन असल्याचे मस्कने म्हटलंय. मोदींनी भारतासाठी अनेक गोष्टी केल्यात. त्यामुळे मी त्यांचा चाहता असल्याचे तो म्हणाला.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

elon musk on PM Narendra Modi HT

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यासंदर्भात एका खाजगी सर्वेक्षण संस्थेने सर्वेक्षण केलंय. त्यात एलाॅन मस्कने मोदींसंदर्भात केलेल्या स्तुतीबद्दल लोकांचं मत जाणून घेण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर आले आहे. सर्वेक्षणात ४८ टक्के लोकांनी मस्कने मोदींची मनापासून प्रशंसा केल्याचंही म्हटलय. तर ३९ टक्के लोकांनी एलाॅन मस्कने पंतप्रधान मोदींबाबत केलेली स्तुती ही केवळ एक औपचारिकता असल्याच नमूद केलंय. १३ टक्के लोकांनी उत्तर माहित नाही , अशी भूमिका घेतली आहे.

या संपूर्ण सर्वेक्षणसाठी तीन दिवसात आठ हजारांहून अधिक लोकांशी बातचीत करुन त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला अमेरिका दौरा संपवून दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा होता, ज्यात त्यांना स्टेट गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं.

विभाग

पुढील बातम्या