मराठी बातम्या  /  बिझनेस  /  HDFC share price : एचडीएफसी बँकेच्या शेअरचे अच्छे दिन सुरू; अवघ्या ७ दिवसांत किती वाढला पाहाच!

HDFC share price : एचडीएफसी बँकेच्या शेअरचे अच्छे दिन सुरू; अवघ्या ७ दिवसांत किती वाढला पाहाच!

Apr 05, 2024, 05:45 PM IST

  • HDFC Bank Share price : मागील काही दिवसांपासून सुस्त पडून असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये आता हालचाल दिसू लागली आहे. हा शेअर गेल्या सात दिवसांत ९ टक्क्यांनी वाढला आहे.

एचडीएफसी बँकेच्या शेअरचे अच्छे दिन सुरू; अवघ्या ७ दिवसांत किती वाढला पाहाच!

HDFC Bank Share price : मागील काही दिवसांपासून सुस्त पडून असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये आता हालचाल दिसू लागली आहे. हा शेअर गेल्या सात दिवसांत ९ टक्क्यांनी वाढला आहे.

  • HDFC Bank Share price : मागील काही दिवसांपासून सुस्त पडून असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये आता हालचाल दिसू लागली आहे. हा शेअर गेल्या सात दिवसांत ९ टक्क्यांनी वाढला आहे.

HDFC share price : जवळपास वर्षभर गुंतवणूकदारांच्या संयमाची कठोर परीक्षा पाहणारा एचडीएफसी बँकेचा शेअर पुन्हा एकदा हलू लागला आहे. मागच्या अवघ्या सात दिवसांत या शेअरमध्ये तब्बल ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळं एचडीएफसीच्या गुंतवणूकदारांचे अच्छे दिन सुरू होणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

एचडीएफसी ही खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळं बँकेच्या शेअरलाही चांगली मागणी आहे. मागील वर्षी ३ जुलै रोजी हा शेअर १७५७.५० रुपयांवर पोहोचला होता. तो उत्तरोत्तर घसरत जाऊन फेब्रुवारी २०२४ मध्ये १३६३.५५ रुपयांवर आला. गेल्या दोन महिन्यांपासून तो १४६० च्या आसपास रेंगाळत होता. मात्र मागच्या सात दिवसांपासून हा क्वालिटी स्टॉक सतत तेजीत आहे. या कालावधीत हा शेअर तब्बल १२५ रुपयांनी वधारला आहे.

आज कशी होती वाटचाल?

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही एचडीएफसी बँकेचा शेअर तेजीत होता. आज एनएसईवर हा शेअर २२.४५ रुपयांनी वाढून १,५५०.०५ रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या सात ट्रेडिंग सत्रांमध्ये तो ८.९१ टक्क्यांनी वाढला आहे.

गेल्या जानेवारीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फटका

या वर्षाच्या सुरुवातीला एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना सुमारे ९ टक्के तोटा सहन करावा लागला आहे. शेअरची कामगिरी सुमार असूनही शेअर बाजार विश्लेषक सकारात्मक होते. एचडीएफसी बँकेनं इंद्रप्रस्थ मेडिकल कॉर्पोरेशन लिमिटेडमधील ३.०३ टक्के हिस्सा अर्थात, २७,८१,८९७ शेअर्स विकले आहेत. आता इंद्रप्रस्थमध्ये एचडीएफसीची २.४५ टक्के भागीदारी आहे.

वाईट काळ सरला!

‘किमतीच्या बाबतीत एचडीएफसी बँकेच्या शेअरचा सर्वात वाईट काळ संपला आहे. तिमाही अपडेट उत्साहवर्धक आहे. १४९० वर शेअरला सपोर्ट दिसत आहे,’ असं ओ'नील इंडियानं ‘बिझनेस टुडे’शी बोलताना सांगितलं.

१६०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो शेअर

जैनम ब्रोकिंगचे टेक्निकल रिसर्च हेड किरण जानी यांच्या अंदाजानुसार, 'नजीकच्या काळात हा शेअर १५६०-१५७० पर्यंत जाऊ शकतो. १४९० वर स्टॉप लॉस लावून जास्तीत जास्त खरेदी करता येऊ शकते. शेअर १५६० वर पोहोचला तर तो १६०० च्या पातळीवरही जाऊ शकतो.'

बीएसईच्या आकडेवारीनुसार, एचडीएफसी बँकेचे एकूण कर्ज वाटपात मार्च तिमाहीत वाढ होऊन तो आकडा २५.०८ लाख कोटींवर पोहोचला आहे. देशांतर्गत किरकोळ कर्जे अनुक्रमे सुमारे ३.७ टक्क्यांनी वाढली आहेत. ठेवी ७.५ टक्क्यांनी वाढून २३.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत.

विभाग

पुढील बातम्या