Amazon Sale: अ‍ॅमेझॉनची भन्नाट ऑफर, वनप्लस कंपनीचा ५७ हजारांचा फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Amazon Sale: अ‍ॅमेझॉनची भन्नाट ऑफर, वनप्लस कंपनीचा ५७ हजारांचा फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी!

Amazon Sale: अ‍ॅमेझॉनची भन्नाट ऑफर, वनप्लस कंपनीचा ५७ हजारांचा फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी!

Apr 04, 2024 08:15 PM IST

Massive Discount On OnePlus 11: वनप्लस ११ च्या खरेदीवर अमेझॉन भरघोस सूट देत आहे.

Grab the OnePlus 11 at under Rs.50000.
Grab the OnePlus 11 at under Rs.50000. (OnePlus)

Smartphones under 50000: स्मार्टफोन अपग्रेड च्या शोधात आहात? वनप्लस 11 हा कंपनीचा फ्लॅगशिप डिव्हाइस आता मोठ्या डिस्काउंटवर उपलब्ध असून तो तुम्हाला ५० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळू शकतो. या सेगमेंटमधील स्मार्टफोन त्यांच्या विविध फीचर्स आणि ऑफरमुळे लोकप्रिय झाले आहेत.  सध्या अ‍ॅमेझॉनवर वनप्लस ११ च्या खरेदीवर ग्राहकांना भरघोस सूट मिळत आहे. ज्यामुळे ग्राहकांना हा फोन अगदी स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो. 

Motorola Edge 50 Pro: जबरदस्त डिस्प्लेसह मोटोरोला एज ५० प्रो भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत

अ‍ॅमेझॉनवर आपण वनप्लस ११ आता ५० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळवू शकतो. वनप्लस ११ ची मूळ किंमत ५६ हजार ९९९ रुपये आहे. अ‍ॅमेझॉनवर हा फोन ४ टक्के डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. यामुळे या फोनची किंमत ५४ हजार ९९९ रुपये इतकी कमी झाली आहे. अतिरिक्त सूट मिळवण्यासाठी आपण वनप्लस ११ ची किंमत आणखी कमी करण्यासाठी बँक आणि एक्सचेंज ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.

एचडीएफसी बँक क्रेडिट ईएमआय कार्ड ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला ४८,४४९ रुपयांच्या किमान खरेदी मूल्यावर ३००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळतो. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन मिनिमम पर्चेस व्हॅल्यू ४७१९९ वर ३००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळू शकतो. तसेच वनप्लस ११ च्या खरेदीवर एक्सचेंज ऑफरचा वापर केल्यास १२८५० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यामुळे वनप्लस ११ च्या किंमतीत लक्षणीय घट होणार आहे.

200 Megapixel Phone: स्वस्तात मिळतोय २०० मेगापिक्सल असलेला 5G फोन!

वनप्लस ११ मधील फीचर्स

वनप्लस ११ मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा एमोलेड क्यूएचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले एचडीआर १०+, एसआरजीबी, १०-बिट कलर डेप्थ आणि पीडब्ल्यूएम + डीसी डिमिंगला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन २ प्रोसेसरसह ८ जीबी LPDDR5X रॅम आणि १२८ जीबी यूएफएस 3.1 स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी वनप्लस ११ मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात सोनी आयएमएक्स ८९० सह ५० एमपी मुख्य कॅमेरा, सोनी आयएमएक्स ५८१ सह ४८ एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा आणि सोनी आयएमएक्स ७०९ सह ३२ एमपी टेलिफोटो लेन्स आहे. या फोनमध्ये ५०० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली, जी १०० वॅटला सपोर्ट करते.

Whats_app_banner