मराठी बातम्या  /  बिझनेस  /  multibagger stock: तीन रुपयांवरून ५,७०० रुपयांवर पोहोचला 'हा' शेअर, कमाईची मोजदादच नाही!

multibagger stock: तीन रुपयांवरून ५,७०० रुपयांवर पोहोचला 'हा' शेअर, कमाईची मोजदादच नाही!

Sep 26, 2023, 05:35 PM IST

  • Apar industries share price : शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांचा हुरूप वाढवणारी बातमी समोर आली आहे. 

Share Market

Apar industries share price : शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांचा हुरूप वाढवणारी बातमी समोर आली आहे.

  • Apar industries share price : शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांचा हुरूप वाढवणारी बातमी समोर आली आहे. 

Apar Industries share price : संयमाचं फळ किती मोठं असू शकतं याचा प्रत्यय सध्या अपार इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना येत आहे. अपार इंडस्ट्रीजच्या शेअरनं गुंतवणूकदारांना 'अपार' नफा मिळवून दिला आहे. मागच्या काही वर्षांत या कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल पावणे दोन लाख टक्क्यांची वाढ झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

एके काळी अवघ्या ३ रुपयांवर असलेला अपार इंडस्ट्रीजचा शेअर सध्या ५,७७० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. आजच्या दिवशी देखील या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली. एनएसईवर हा शेअर ६.०९ टक्क्यांनी अर्थात, ३३१.१० रुपयांनी वाढला. शेअरच्या भावातील आजची वाढ ही एका मोठ्या घोषणेमुळं झाली आहे. अपार इंडस्ट्रीजनं निधी उभारणीशी संबंधित मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे.

'या' तारखेला होणार निर्णय

अपार इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाची एक महत्त्वाची बैठक गुरुवार, २८ सप्टेंबर रोजी होत आहे. या बैठकीत निधी उभारणीशी संबंधित योजनांचा विचार केला जाईल. अपार इंडस्ट्रीजच्या शेअरनं आज, २६ सप्टेंबर रोजी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. २० सप्टेंबर रोजी नोंदवलेल्या उच्चांक आज मागे टाकला गेला आहे.

कोणत्या व्यवसायात आहे अपार इंडस्ट्रीज?

अपार इंडस्ट्रीज ही कंडक्टर, केबल्स, स्पेशालिटी ऑइल, वंगण आणि पॉलिमर निर्मिती करणारी जगातील एक आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी अ‍ॅल्युमिनियम आणि मिश्र धातु कंडक्टरच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. ट्रान्सफॉर्मर ऑइलचं उत्पादन करणारी ही जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

कंपनीच्या शेअर्समध्ये १,७५,००० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ

सुमारे २२ वर्षांपूर्वी, म्हणजेच ५ ऑक्टोबर २००१ रोजी अपार इंडस्ट्रीजचे शेअर्स ३.२३ रुपयांवर व्यवहार करत होते. आज, २६ सप्टेंबर २०२३ रोजी कंपनीचे शेअर्स ५,७७० रुपयांवर पोहोचले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल १,७६,९९५ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागच्या १० वर्षांत अपार इंडस्ट्रीजचे शेअर्स ६५०० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. या कालावधीत कंपनीचे शेअर्स ८७ रुपयांवरून ५७७० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

पुढील बातम्या