मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stock Market News : अदानी समूहाच्या या शेअरमध्ये जबरदस्त तेजी, घ्यावा की नाही? एक्सपर्ट्स म्हणतात…

Stock Market News : अदानी समूहाच्या या शेअरमध्ये जबरदस्त तेजी, घ्यावा की नाही? एक्सपर्ट्स म्हणतात…

Jan 09, 2024, 02:27 PM IST

  • Experts bullish on Adani Ports : अदानी समहूाच्या अदानी पोर्ट्सचा शेअर जोरदार तेजीत असून या पार्श्वभूमीवर एक्सपर्ट्सनी आपलं मत मांडलं आहे.

Adani Ports Share Price

Experts bullish on Adani Ports : अदानी समहूाच्या अदानी पोर्ट्सचा शेअर जोरदार तेजीत असून या पार्श्वभूमीवर एक्सपर्ट्सनी आपलं मत मांडलं आहे.

  • Experts bullish on Adani Ports : अदानी समहूाच्या अदानी पोर्ट्सचा शेअर जोरदार तेजीत असून या पार्श्वभूमीवर एक्सपर्ट्सनी आपलं मत मांडलं आहे.

Motilal Oswal bullish on Adani Ports : अदानी समूहाची आघाडीची कंपनी असलेल्या अदानी पोर्ट्सच्या शेअरच्या किंमतीत वाढ होत आहे. आजही त्यात ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून या शेअरनं ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. या तेजीनंतर ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालनं शेअरबद्दल विश्वास व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mahindra XUV 3XO: महिंद्रा एक्सयूवी ३ एक्सओ लॉन्च, टाटा नेक्सन आणि ह्युंदाई वेन्यूला टक्कर देणार; जाणून घ्या किंमत

Car Damaged Compensation: चक्रीवादळात तुमच्या वाहनाचं नुकसान झालंय? काळजी नको, 'अशी' मिळवा नुकसान भरपाई

Mutual Fund : वयाच्या ८० व्या घर विकून केली म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक? कसा होतोय फायदा?

gadgets news : मोबाईल वापरकर्त्यांना मोठा झटका! 'या' मोफत सेवा झाल्या बंद, आता मोजावे लागणार २४०० रुपये

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी, आज बीएसईवर अदानी पोर्ट्सचे शेअर्स ११८४.०५ रुपयांच्या पातळीवर उघडला. काही वेळातच हा शेअर ५.२३ टक्क्यांच्या उसळीसह १२२९.९० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. अदानी पोर्ट्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३९४.९५ रुपये आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत १८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सध्या हा शेअर २.५७ टक्के वाढीसह ११९८.९० रुपयांवर ट्रेड करत आहे.

Stock Market Investment : शेअर बाजारात गुंतवणूक करताना टाळा 'या' बेसिक चुका

का वाढतोय हा शेअर?

अदानी पोर्ट्सच्या शेअरच्या किमती वाढण्यामागे बाँड मार्केट हे कारण असल्याचं मानलं जात आहे. अदानी पोर्ट्सनं गेल्या २ वर्षांत पहिल्यांदाच सोमवारी रोखे जारी केले. कंपनीच्या रोख्यांना चांगली मागणी असल्याचं दिसत आहे. कंपनीनं ५०० कोटी रुपयांच्या २ सूचीबद्ध बाँडसाठी बोली स्वीकारल्या आहेत. त्यापैकी एक ५ वर्षात आणि दुसरा १० वर्षात मॅच्युअर होईल. त्यांचे दर अनुक्रमे ७.८० टक्के आणि ७.९० टक्के असतील.

हिंडनबर्ग प्रकरणात सेबीशिवाय इतर कोणत्याही तपासाची गरज नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर अदानी समूहाचे शेअर वाढत आहेत. त्यातच बाँड काढण्यात आल्यामुळं अदानी पोर्ट्सला अधिक बळ मिळालं आहे.

Bonus Share Explained : बोनस शेअर्स म्हणजे काय? ते का आणि कोणाला दिले जातात? जाणून घ्या सर्वकाही

ब्रोकरेज हाऊस आशावादी

देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल अदानी पोर्ट्सच्या शेअरबाबत प्रचंड आशावादी आहे. २०३० पर्यंत अदानी पोर्ट्स जगातील सर्वात मोठी पोर्ट ऑपरेट करणारी खासगी कंपनी बनेल, असं मोतीलाल ओसवालनं म्हटलं आहे. मागील वर्षाच्या तुलनेत डिसेंबरच्या तिमाहीत अदानी पोर्ट्सच्या व्हॉल्यूममध्ये ४२ टक्के वाढ झाली आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्तात कंपनीच्या व शेअरच्या कामगिरीची केवळ माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

पुढील बातम्या