मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : काँग्रेसमध्ये पाच सत्ताकेंद्र, पाचवं नाव ऐकून चकीत व्हाल! काय म्हणाले संजय निरुपम?

Video : काँग्रेसमध्ये पाच सत्ताकेंद्र, पाचवं नाव ऐकून चकीत व्हाल! काय म्हणाले संजय निरुपम?

Apr 04, 2024, 03:45 PMIST

 Sanjay Nirupam Targets Congress : काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले माजी खासदार संजय निरुपम सध्या मीडियासमोर येऊन पक्षावर टीकेची झोड उठवत आहेत. काँग्रेसमधील गटबाजीवर त्यांनी मोठा खुलासा केला आहे. काँग्रेस पक्षात पाच सत्ता केंद्रं आहेत. त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ही तीन सत्ताकेंद्रे आहेत. चौथं सत्ताकेंद्र पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे असून पाचवं सत्ताकेंद्र महासचिव के सी वेणुगोपाल हे आहेत. या पाच सत्ताकेंद्रांमध्ये सतत संघर्ष सुरू असतो आणि त्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसतो, असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे. संजय निरुपम हे उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, पक्षानं त्यांच्या नावाचा विचारही केला नाही आणि त्यांच्या नाराजीकडंही लक्ष दिलं नाही. त्यामुळं ते अधिकच संतापले आहेत.