मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant : ऋषभ पंतने अचानक जन्मतारीख बदलली, विश्वचषकापूर्वीच असं का केलं? जाणून घ्या

Rishabh Pant : ऋषभ पंतने अचानक जन्मतारीख बदलली, विश्वचषकापूर्वीच असं का केलं? जाणून घ्या

Jun 28, 2023, 09:36 PM IST

    • Rishabh Pant Date Of Birth : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने त्याची दुसरी जन्मतारीख शेअर केली आहे. पंतने असे का केले ते जाणून घ्या.
Rishabh Pant

Rishabh Pant Date Of Birth : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने त्याची दुसरी जन्मतारीख शेअर केली आहे. पंतने असे का केले ते जाणून घ्या.

    • Rishabh Pant Date Of Birth : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने त्याची दुसरी जन्मतारीख शेअर केली आहे. पंतने असे का केले ते जाणून घ्या.

Why Rishabh Pant Changed His Date Of Birth : भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातानंतर झालेल्या दुखापतीतून सावरत आहे. ऋष भ पंत वेगाने रिकव्हर करत आहे. अशातच पंतने त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये मोठा बदल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

वास्तविक, भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने त्या इन्स्टा बायोमध्ये आणखी एक जन्मतारीख लिहिली आहे. या जन्मतारखेला ऋषभ पंतने त्याची दुसरी जन्मतारीख ०५/०१/२३ असे म्हटले आहे. अपघातानंतर ज्या दिवशी तो शुद्धीवर आला ती तारीख ऋषभने दुसरा जन्म म्हणून लिहिली आहे.

गेल्या वर्षी कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. ३० डिसेंबर २०२२ रोजी दिल्लीहून रुरकी येथील त्याच्या घरी जात असताना पंतचा अपघात झाला होता. अपघातानंतर स्थानिक लोकांनी पंतला रुग्णालयात नेले. या अपघातानंतर पंतवर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. तथापि, सध्या हा स्टार यष्टीरक्षक फलंदाज राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे, जिथे तो पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. पंतची खरी जन्मतारीख ४ ऑक्टोबर १९९७ आहे.

पंतच्या प्रकृतीत बरीच सुधारणा 

अपघातानंतर पंतच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. अलीकडेच, त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो कोणत्याही आधाराशिवाय पायऱ्या चढताना दिसत होता. पंत एनसीएमध्ये त्याच्या फिटनेससाठी कठोर परिश्रम घेत आहे. पंत विश्वचषकापर्यंत पुनरागमन करू शकतो, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पंतने अलीकडेच एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर आणि केएल राहुल उपस्थित होते. रिहॅबसाठी केएल राहुलही सध्या एनसीएमध्ये आहे. IPL 2023 मध्ये एका सामन्यात क्षेत्ररक्षण करताना राहुलच्या पायाला दुखापत झाली होती. राहुलवर काही काळापूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

याशिवाय भारतीय स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज श्रेयस अय्यर हे देखील तंदुरुस्तीसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहेत. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह आणि अय्यर यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतर ते रिहॅब प्रक्रियेतून जात आहेत.

पुढील बातम्या