मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sikandar Shaikh : सिकंदर शेख कोण आहे? गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र केसरीत त्याच्यासोबत काय घडलं होतं? पाहा

Sikandar Shaikh : सिकंदर शेख कोण आहे? गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र केसरीत त्याच्यासोबत काय घडलं होतं? पाहा

Nov 11, 2023, 02:06 PM IST

    • sikandar shaikh maharshtra kesari 2023 : सिंकदर शेखने यावर्षीची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे. त्याने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे याला आस्मान दाखवले. यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्याच्या लोणीकंद - फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलच्या मैदानावर पार पडली.
sikandar shaikh maharshtra kesari 2023

sikandar shaikh maharshtra kesari 2023 : सिंकदर शेखने यावर्षीची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे. त्याने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे याला आस्मान दाखवले. यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्याच्या लोणीकंद - फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलच्या मैदानावर पार पडली.

    • sikandar shaikh maharshtra kesari 2023 : सिंकदर शेखने यावर्षीची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे. त्याने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे याला आस्मान दाखवले. यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्याच्या लोणीकंद - फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलच्या मैदानावर पार पडली.

who is sikandar shaikh : पैलवान सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. त्याने महाराष्ट्र केसरी २०२३ च्या फायनलमध्ये शिवराज राक्षे याचा पराभव केला. सिंकदरने अवघ्या १० सेंकदार मैदान मारले. त्याने झोळी डाव टाकून शिवराजला चीत केले आणि ६६ वा महाराष्ट्र केसरी बनण्याचा बहुमान मिळवला. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

यंदा शिवराजकडे सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी बनण्याची संधी होती. पण सिंकदरने तसे होऊ दिले नाही.

दरम्यान, सिंकदर शेख गेल्या वर्षी सेमी फायनलमध्ये पराभूत झाला होता. पण त्यानंतर तो सोशल मीडियावर हिरो ठरला. गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदरवर अन्याय झाल्याचे अनेक चाहत्यांचे आणि कुस्ती तज्ज्ञांचे मत होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सिंकदरच्या बाजूने एक भावनिक लाट उसळली होती.

गेल्या वर्षी  सिकंदरचा सेमी फायनलमध्ये महेंद्र गायकवाड याच्याकडून पराभव झाला होता. यानंतर महेंद्र गायकवाड हा फायनलमध्ये शिवराज राक्षे याच्याकडून पराभूत झाला. 

गेल्यावर्षी नेमकं काय घडलं होतं?

गेल्यावर्षी म्हणजेच, महाराष्ट्र केसरी २०२२ मध्ये मातीवरची फायनल आणि महाराष्ट्र केसरीची सेमी फायनल कुस्ती महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेखमध्ये झाली. यात महेंद्रने बाजी मारली. महेंद्रने बाहेरची टांग डाव टाकत सिकंदरचा पराभव केलाहोता. या डावाची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली. 

महेंद्र गायकवाडने टाकलेला बाहेरील टांग हा डाव नियमानुसार नव्हता. तसेच, त्यावेळी सिकंदर शेख डेन्जर पोझिशनलादेखील नव्हता मग महेंद्रला ४ गुण का देण्यात आले? असे प्रश्न उपस्थित झाले होते.

सिकंदर शेख कोण आहे?

सिकंदर मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातला असून त्याच्या घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेपर्यंतचा सिकंदरचा प्रवास हा अतिशय खडतर राहिला आहे. त्याचे वडीलही कुस्ती खेळायचे. पण गरिबीमुळे त्यांना हमालीचे काम करावे लागत होते. सिकंदर अलीकडेच भारतीय लष्करात भरती झाला आहे. तो सैन्यदलाकडूनही खेळतो. आपला मुलगा मोठा मल्ल बनावा ही वडीलांची इच्छा त्याने पुर्ण केली आहे.

सिंकदरने आतापर्यंत देशभरात अनेक कुस्त्या लढून बक्षिसे जिंकली आहेत. यामध्ये सिकंदरने एक महिन्द्रा थार चारचाकी, एक जॉन डिअर ट्रॅक्टर, ४ अल्टो कार, २४ बुलेट, ६ टिव्हीएस, ६ सप्लेंडर तर तब्बल ४० चांदीच्या गदा जिंकल्या आहेत.

 

पुढील बातम्या