मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind-SL ODI : उमरान मलिकनं फेकलेल्या सर्वाधिक वेगवान चेंडूवरून नवा वाद; पाहा नेमकं काय घडलं?

Ind-SL ODI : उमरान मलिकनं फेकलेल्या सर्वाधिक वेगवान चेंडूवरून नवा वाद; पाहा नेमकं काय घडलं?

Jan 11, 2023, 12:19 PM IST

  • confusion over Umran Malik's fastest ball : भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यानं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात फेकलेल्या एका चेंडूवरून वाद निर्माण झाला आहे.

Umran Malik (PTI)

confusion over Umran Malik's fastest ball : भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यानं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात फेकलेल्या एका चेंडूवरून वाद निर्माण झाला आहे.

  • confusion over Umran Malik's fastest ball : भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यानं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात फेकलेल्या एका चेंडूवरून वाद निर्माण झाला आहे.

confusion over Umran Malik's fastest ball : टीम इंडियाचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज उमरान मलिक यानं श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेगात गोलंदाजीचा विक्रम केला होता. त्यानं १५६ किलोमीटर प्रतितास वेगाने एक चेंडू फेकला होता. भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडू मानला जातो. मात्र, आता या चेंडूच्या नेमक्या वेगावरून वाद सुरू झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

गुवाहाटी इथं मंगळवारी भारत विरुद्ध श्रीलंका हा सामना झाला. तत्पूर्वी, श्रीलंकेविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील एका सामन्यात उमरान मलिकनं १५५ किमी प्रतितास वेगानं एक चेंडू टाकला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजाकडून टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडू ठरला होता. आपला हा विक्रम मंगळवारी उमराननं मोडला. मात्र आता त्यावरून मतभेद निर्माण झाले आहेत.

सामन्याचं अधिकृत प्रसारण करणाऱ्या हिंदी आणि इंग्रजी ब्रॉडकास्टर्सनी उमरानच्या चेंडूचा वेग वेगळा दाखवला. त्यामुळं उमराननं नेमका किती वेगानं चेंडू टाकला यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या संभ्रमामुळं त्याला १५६ किमी प्रतितास वेगानं चेंडू टाकण्याचं श्रेय दिलं जाणार नाही, असं मानलं जात आहे. इंग्रजी ब्रॉडकास्टरनं उमरानच्या चेंडूचा वेग १४५.७ किमी प्रतितास इतका दाखवला, तर हिंदी ब्रॉडकास्टरनं १५५ किमी प्रतितास इतका दाखवला. त्यामुळं संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. आता या चेंडूच्या वेगाची अधिकृत नोंद जरी झाली नाही, तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. उमराननं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात प्रभावी गोलंदाजी केली. त्यानं आठ षटकांत ५७ धावा देत तीन बळी घेतले.

पुढील बातम्या