मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Umran Malik: उमरानला चीयर करू नका; तो जोशात आला तर देवच तुम्हाला वाचवू शकतो, ‘या’ फलंदाजाचा खुलासा

Umran Malik: उमरानला चीयर करू नका; तो जोशात आला तर देवच तुम्हाला वाचवू शकतो, ‘या’ फलंदाजाचा खुलासा

Jan 05, 2023, 05:05 PM IST

    • Vivrant Sharma on Umran Malik Speed: २३ वर्षीय उमरानच्या या वेगाबद्दल त्याचा सहकारी खेळाडू विव्रंत शर्माने एक खुलासा केला आहे. हे दोन्ही युवा खेळाडू जम्मू-काश्मीरचे आहेत आणि आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) क्रिकेट खेळताना दिसणार आहेत.
Umran Malik Speed

Vivrant Sharma on Umran Malik Speed: २३ वर्षीय उमरानच्या या वेगाबद्दल त्याचा सहकारी खेळाडू विव्रंत शर्माने एक खुलासा केला आहे. हे दोन्ही युवा खेळाडू जम्मू-काश्मीरचे आहेत आणि आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) क्रिकेट खेळताना दिसणार आहेत.

    • Vivrant Sharma on Umran Malik Speed: २३ वर्षीय उमरानच्या या वेगाबद्दल त्याचा सहकारी खेळाडू विव्रंत शर्माने एक खुलासा केला आहे. हे दोन्ही युवा खेळाडू जम्मू-काश्मीरचे आहेत आणि आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) क्रिकेट खेळताना दिसणार आहेत.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आपल्या वेगानं अनेकांना हैराण केले आहे. त्याच्या वेगापुढे विरोधी फलंदाज तर हैराण होतच आहेत. पण सहकारी खेळाडूही त्याचा वेग पाहून आश्चर्यचकित होत आहेत. उमरानने अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात १५५च्या स्पीडने गोलंदाजी केली.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

२३ वर्षीय उमरानच्या या वेगाबद्दल त्याचा सहकारी खेळाडू विव्रंत शर्माने एक खुलासा केला आहे. हे दोन्ही युवा खेळाडू जम्मू-काश्मीरचे आहेत आणि आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. उमरान नेटमध्येही १६० च्या वेगाने गोलंदाजी करतो, असे विव्रंत म्हणाला आहे.

नेटमध्ये गोलंदाजी करताना उमरानला कोणी चिअर केले तर त्याला जोश येतो. यानंतर उमरान आपली स्पीड आणखी वाढवतो. अशा परिस्थितीत फक्त देवच फलंदाजाला वाचवू शकतो.

विव्रंत शर्मा काय म्हणाला?

२३ वर्षीय विव्रंत शर्माने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, 'नेटमध्येही, जर कोणी उमरानला चीअर करायला सुरुवात केली, तर तो उत्साहित होतो आणि खूप वेगाने गोलंदाजी करू लागतो. तो आपल्या वेगानेच फलंदाजाला मारतो. उमरानचा सामना करताना २२ यार्डचे अंतर १८ यार्ड वाटायला लागते आणि जर ४ लोकांनी त्याला व्वाह उमरान वाह! म्हटले तर मग त्यानंतर फक्त देवच फलंदाजाला वाचवू शकतो".

लेग-स्पिनर आणि धडाकेबाज फलंदाज विव्रंत म्हणाला की उमरान नेटमध्ये सतत १६० पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करतो. त्याला खेळल्यानंतर, बाकीच्या गोलंदाजांना खेळणे खूप सोपे वाटते जे १३५ च्या वेगाने गोलंदाजी करतात.

पुढील बातम्या