मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ganguly and Virat Kohli : विराट कोहली सौरव गांगुलीवर संतापला होता? शेन वॉटसननं केला खुलासा

Ganguly and Virat Kohli : विराट कोहली सौरव गांगुलीवर संतापला होता? शेन वॉटसननं केला खुलासा

Apr 21, 2023, 03:19 PM IST

    • ganguly virat kohli IPL 2023 : सौरव गांगुली (sourav ganguly) आणि विराट कोहली (virat kohli) यांच्यातील वादावर शेन वॉटसनने (shane watson) मौन तोडत मोठा खुलासा केला आहे.
Ganguly and Virat Kohli

ganguly virat kohli IPL 2023 : सौरव गांगुली (sourav ganguly) आणि विराट कोहली (virat kohli) यांच्यातील वादावर शेन वॉटसनने (shane watson) मौन तोडत मोठा खुलासा केला आहे.

    • ganguly virat kohli IPL 2023 : सौरव गांगुली (sourav ganguly) आणि विराट कोहली (virat kohli) यांच्यातील वादावर शेन वॉटसनने (shane watson) मौन तोडत मोठा खुलासा केला आहे.

सध्या आयपीएल 2023चा थरार सुरू आहे. या दरम्यान सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. मात्र, आता या वादाचे खरे कारण समोर आले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग पॅनलचा सदस्य आणि माजी क्रिकेटपटू शेन वॉटसन याने या वादाचे खरे कारण स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर वॉटसनने विराट कोहलीला जबाबदार धरत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

वास्तविक, गेल्या आठवड्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि आरसीबी (rcb) यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला. सामना संपल्यानंतर जेव्हा खेळाडू आणि स्टाफ हात मिळवत होते तेव्हा सौरव गांगुली हा विराट कोहलीकडे दुर्लक्ष करत पुढे निघून गेला. यानंतर या दोन माजी कर्णधारांनी हस्तांदोलन न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

शेन वॉटसन काय म्हणाला?

या वादावर शेन वॉटसनने मौन तोडले आणि म्हणाला की, "अशा अनेक अफवा आहेत ज्याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही." मात्र विराट कोहली रागात होता हे खरे आहे. मैदानावर तो आक्रमकच असतो, विराट कोहली जेव्हा आक्रमक आणि रागात असतो तेव्हा तो त्याचे सर्वोत्तम देतो. त्याच्या रागाचे आणि आक्रमकतेचे कारण काहीही असू शकते".

विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील वाद जुना

विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील वाद जुना आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यावेळी सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष होता. तेव्हापासून दोघांचा वाद समोर आला होता'.

काही काळानंतर विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले आणि त्यानंतर या दोन्ही खेळाडूंमधील वाद आणखी वाढला. यानंतर जानेवारी २०२२ मध्ये विराट कोहलीने कसोटीचेही कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विराट कोहलीच्या जागी रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची कमान सांभाळत आहे.

पुढील बातम्या