मराठी बातम्या  /  क्रीडा  /  माझ्यामुळं सचिन क्रिकेट सोडायला निघाला होता; माजी प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

माझ्यामुळं सचिन क्रिकेट सोडायला निघाला होता; माजी प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

Feb 14, 2023, 12:16 PM IST

  • Gary Kirsten on Sachin Tendulkar in Final Word Cricket Podcast : द फायनल वर्ड क्रिकेट पॉडकास्टमध्ये भारताच्या माजी प्रशिक्षकाने सचिनसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आ

Sachin Tendulkar

Gary Kirsten on Sachin Tendulkar in Final Word Cricket Podcast : द फायनल वर्ड क्रिकेट पॉडकास्टमध्ये भारताच्या माजी प्रशिक्षकाने सचिनसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आ

  • Gary Kirsten on Sachin Tendulkar in Final Word Cricket Podcast : द फायनल वर्ड क्रिकेट पॉडकास्टमध्ये भारताच्या माजी प्रशिक्षकाने सचिनसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आ

Gary Kirsten on Sachin Tendulkar : भारतीय क्रिकेट संघाला गेल्या दोन दशकांमध्ये काही चांगले प्रशिक्षक मिळाले आहेत. तर, काही प्रशिक्षकांमुळे संघात वादही निर्माण झाला आहे. भारताला २०११ मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टनच्या नियुक्तीमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर निराश झाला. अॅडम कॉलिन्ससोबतच्या द फायनल वर्ड क्रिकेट पॉडकास्टमध्ये गॅरी कर्स्टन मोठा खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

गॅरी कर्स्टन यांची २००७ मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती, जेव्हा भारतीय क्रिकेट संघ संघर्ष करीत होता. मात्र, गॅरी कर्स्टन यांनी सुत्रे हाती घेताच भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळाला. गॅरी कर्स्टनच्या मार्गदर्शनाखाली भारताने अनेक सामने जिंकले. मात्र, अॅडम कॉलिन्ससोबतच्या द फायनल वर्ड क्रिकेट पॉडकास्टमध्ये गॅरी कर्स्टन सचिनबाबत मोठा खुलासा केला आहे. जेव्हा त्यांची भारतीय संघात नियुक्ती झाली, तेव्हा सचिन नाराज होता, त्यावेळी त्याने निवृत्तीचा विचार केला, असे गॅरी कर्स्टन यांनी म्हटले.

पुढे गॅरी कर्स्टन म्हणाले की, भारताच्या प्रतिभावान संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि जगातील सर्वोत्तम संघ बनवण्यासाठी माझ्यासमोर मोठे आव्हान होते. कोणत्याही प्रशिक्षकाला अशा समस्यांना सामोरे जावा लागते. जेव्हा संघाची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली, तेव्हा भारतीय संघात अनेकजण नाराज होते. त्यावेळी मला संघातील सदस्यांना समजून घेणे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे होते.

सचिनबाबत गॅरी कर्स्टन म्हणाले की, माझे संघात सामील होणे, कदाचित सचिनला खटकले होते, माझ्या नियुक्तीमुळे तो खूप निराश झाला. त्यावेळी त्याने क्रिकेटला अलविदा करण्याचा विचारही सुरु केला. त्यामुळे त्याच्याशी संवाद साधणे आणि तो संघासाठी किती महत्त्वाचा खेळाडू आहे, याची त्याला जाणीव करून देणे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे होते.

पुढील बातम्या