मराठी बातम्या  /  क्रीडा  /  West Indies vs India Test : विंडसर पार्कवर आश्विन-जडेजाचं वादळ; घरच्या मैदानावर विंडीजचा दारुण पराभव

West Indies vs India Test : विंडसर पार्कवर आश्विन-जडेजाचं वादळ; घरच्या मैदानावर विंडीजचा दारुण पराभव

Jul 15, 2023, 06:19 AM IST

    • West Indies vs India Test : आश्विन आणि जडेजाच्या फिरकीसमोर विंडीजच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्याने भारताला मोठा विजय मिळाला आहे.
West Indies vs India 1st Test (AP)

West Indies vs India Test : आश्विन आणि जडेजाच्या फिरकीसमोर विंडीजच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्याने भारताला मोठा विजय मिळाला आहे.

    • West Indies vs India Test : आश्विन आणि जडेजाच्या फिरकीसमोर विंडीजच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्याने भारताला मोठा विजय मिळाला आहे.

West Indies vs India 1st Test : फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि रवींचंद्रन आश्विन यांच्या भेदक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्याने टीम इंडियाचा पहिल्याच कसोटी सामन्यात मोठा विजय झाला आहे. भारताने वेस्ट इंडिजवर एक डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला आहे. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी शतकी खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला होता. त्यानंतर आश्विनने दुसऱ्या डावात सात विकेट घेत विजयाचं तोरण बांधलं आहे. या विजयासह भारतीय संघाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तसेच भारतीय फलंदाज आणि गोलंदाज चांगलेच फॉर्मात असल्याने पुढील सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज संघाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांनी चांगलीच फटकेबाजी करायला सुरुवात केली. परंतु द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करत असलेला सलामीवीर यशस्वी जैस्वाल १७१ धावांवर बाद झाला. त्यानंतर विंडीजचा फिरकीपटू कार्नवालने विराट कोहलीला ७६ धावांवर बाद केलं. इशान किशन आणि रवींद्र जडेजा खेळत अशताना कर्णधार रोहित शर्माने भारताचा पहिला डाव ४२१ धावांवर घोषित केला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी भारतीय फिरकीपटूंसमोर नांग्या टाकल्या. आश्विन आणि जाडेजाने भेदक गोलंदाजी करत वेस्ट इंडिजचा डाव १३० धावांतच रोखत संघाला मोठा विजय मिळवून दिला. पदार्पणातच दीडशतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला सामनावीर घोषित करण्यात आलं आहे.

रवीचंद्रन आश्विनने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात सात वीकेट्स घेतल्या आहे. तर रवींद्र जाडेजाने पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात दोन वीकेट्स घेतल्या आहे. त्यामुळं आता भारतीय फिरकीपटूंनी विदेशात जोरदार कामगिरी केल्यामुळं टीम इंडियाच्या चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिज विरोधात तीन कसोटी सामने, तीन वनडे आणि पाच टी-ट्वेंटी सामने खेळणार आहे. परंतु आता पहिल्याच सामन्यात भारताने विंडीजवर विजय मिळवल्याने चाहते खूश झाले आहे. तसेच विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाने दावा पक्का केला आहे.

पुढील बातम्या