मराठी बातम्या  /  क्रीडा  /  LSG New Coach : ऑस्ट्रेलियाला टी-20 वर्ल्डकप जिंकून देणारा हेड कोच लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात, पाहा

LSG New Coach : ऑस्ट्रेलियाला टी-20 वर्ल्डकप जिंकून देणारा हेड कोच लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 14, 2023 08:18 PM IST

justin langer LSG coach : आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सने मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज जस्टिन लँगर याच्या नावाची घोषणा केली आहे. लँगर अँडी फ्लॉवरची जागा घेईल.

justin langer LSG coach
justin langer LSG coach

इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ने एक मोठी घोषणा केली आहे. लखनौ सुपर जायंट्सने जस्टिन लँगरची मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली आहे. याआधी, अँडी फ्लॉवर सुरुवातीच्या २ हंगामात संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत होता. जस्टिन लँगरला मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आल्याची माहिती फ्रँचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जस्टिन लँगर लखनौ सुपर जायंट्सचा नवा कोच

अँडी फ्लॉवरचा लखनौ सुपर जायंट्स फ्रँचायझीसोबत दोन वर्षांचा करार होता, जो या वर्षीच्या हंगामाच्या शेवटी संपला. त्याचवेळी, जस्टिन लँगर सध्या कोणत्याही संघासाठी प्रशिक्षक करारात नाही. जस्टिन लँगरने २०२१ साली झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाला विजय मिळवून देण्यात प्रशिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती.

जस्टिन लँगर याने २०१८ मध्ये सँडपेपर घटनेनंतर ऑस्ट्रेलियन संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. यानंतर, त्याच्या कार्यकाळात टी-20 विश्वचषक जिंकण्याबरोबरच, संघाने अॅशेस मालिकेत इंग्लंडचा ४-० ने पराभव केला.

लखनौचा संघ दोन्ही हंगामात प्लेऑफमधून बाहेर

लखनौ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत दोन आयपीएल हंगाम खेळले आहेत, दोन्हीवेळा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला, परंतु संघाचा प्रवास एलिमिनेटर सामन्यातच संपला. सध्या भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर हा संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहे.

WhatsApp channel