मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Team India New Jersey: वर्ल्डकपमध्ये नव्या लुकमध्ये दिसणार टीम इंडिया, लवकरच नवी जर्सी मिळणार

Team India New Jersey: वर्ल्डकपमध्ये नव्या लुकमध्ये दिसणार टीम इंडिया, लवकरच नवी जर्सी मिळणार

Sep 13, 2022, 03:57 PM IST

    • Team India New Jersey: भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत किट प्रायोजक 'एमपीएल स्पोर्ट्स'ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये टीम इंडियासाठी नवीन जर्सी लाँच होणार असल्याचे बोलले जात आहे.
Team India

Team India New Jersey: भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत किट प्रायोजक 'एमपीएल स्पोर्ट्स'ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये टीम इंडियासाठी नवीन जर्सी लाँच होणार असल्याचे बोलले जात आहे.

    • Team India New Jersey: भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत किट प्रायोजक 'एमपीएल स्पोर्ट्स'ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये टीम इंडियासाठी नवीन जर्सी लाँच होणार असल्याचे बोलले जात आहे.

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाने आपली मोहीम तीव्र केली आहे. सोमवारी भारतीय १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज संघाच्या नवीन जर्सीची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत किट भागीदार 'एमपीएल स्पोर्ट्स'ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये भारतीय संघ टी-20 विश्वचषकात नव्या जर्सीसह उतरणार असल्याचे सांगण्यात आलेआहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या दिसत आहेत. तर यामध्ये हार्दिक पांड्या चाहत्यांना टीम इंडियाच्या नवीन जर्सीचा भाग होण्यास सांगत आहे.

हा व्हिडिओ समोर येताच चाहत्यांनी नवीन जर्सीसाठी वेगवेगळे सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. कुणी जुन्या स्काय ब्लू जर्सीची मागणी करत आहे. तर कुणी म्हणत आहे, “यावेळी तीच जर्सी असेल जी २००७ मध्ये पहिल्या T20 वर्ल्ड कपमध्ये होती”.

सुपर-१२ चे सामने २२ ऑक्टोबरपासून सुरू होतील

२२ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या सामन्याने टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. मात्र, त्याआधी १६ ते २१ ऑक्टोबर दरम्यान पात्रता सामने खेळवले जातील. भारतीय संघ २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

पुढील बातम्या