मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 WC: भारत-इंग्लंडमध्ये आज महासंग्राम; कोणाचे पारडे जड? पाहा आतापर्यंतची आकडेवारी

T20 WC: भारत-इंग्लंडमध्ये आज महासंग्राम; कोणाचे पारडे जड? पाहा आतापर्यंतची आकडेवारी

Nov 10, 2022, 11:44 AM IST

  • T20 WC Ind-Eng Semifinal: विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील दुसरा सामना आज भारत व इंग्लंड संघांमध्ये रंगणार आहे.

England Vs India

T20 WC Ind-Eng Semifinal: विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील दुसरा सामना आज भारत व इंग्लंड संघांमध्ये रंगणार आहे.

  • T20 WC Ind-Eng Semifinal: विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील दुसरा सामना आज भारत व इंग्लंड संघांमध्ये रंगणार आहे.

T20 World Cup: टी-२० विश्वचषकासाठी अंतिम लढत कोणत्या दोन संघांमध्ये होणार याचा फैसला आज होणार आहे. भारत आणि इंग्लंड संघांमध्ये आज उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. अॅडलेडमध्ये हा सामना होणार असून त्यात कोण बाजी मारणार याकडं जगभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघाची आतापर्यंतची विजय-पराभवाची आकडेवारी आणि गेमचेंजर खेळाडूंवर नजर टाकणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

विश्वचषक स्पर्धेतील सुपर १२ फेरीत टीम इंडियानं आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. चार विजयासह भारतानं 'गट २' मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारताकडून विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव सर्वाधिक यशस्वी फलंदाज ठरले आहेत. सेमीफायनलमध्येही त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. इंग्लंडची विश्वचषकातील आतापर्यंतची कामगिरी म्हणावी तितकी प्रभावी ठरलेली नाही. इंग्लंडनं श्रीलंकेला हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असला तरी आयर्लंडसारख्या नवख्या संघाकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारत आणि इंग्लंडच्या मागच्या दोन वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास भारताची कामगिरी इंग्लंडपेक्षा उजवी ठरली आहे. टी-२० मध्ये इंग्लंडविरोधात सर्वात वेगवान धावा करण्याचा विक्रम भारताच्या सूर्यकुमार यादवच्या नावे आहे. यंदाच्या जुलै महिन्यात सूर्यकुमारनं अवघ्या ४८ चेंडूत इंग्लंडविरोधात शतक ठोकलं होतं. याच सामन्यात त्यानं ११७ धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्ध भारत सामन्यांतील सर्वाधिक धावांचा हा विक्रम आहे. इंग्लंडच्या विरोधात सूर्यकुमार यादवचा स्ट्राइक रेट १९५ पेक्षा जास्त आहे. विराट कोहलीची बॅटही इंग्लंडच्या विरोधात नेहमीच तळपली आहे. मागील वर्षीच्या मार्चपासून आतापर्यंत विराटनं इंग्लंडविरुद्ध चार अर्धशतकं ठोकली आहेत. या भारतासाठी जमेच्या बाजू आहेत.

इंग्लंड सरस कुठे?

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंड काही बाबतीत मात्र भारतीय संघापेक्षा सरस ठरला आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत झालेल्या टी-२० मालिकांमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम इंग्लंडच्या क्रीस जॉर्डन याच्या नावावर आहे. त्यानं १८ गडी बाद केले आहेत. भागीदारीचा विक्रम जोस बटलर आणि डेव्हिड मलान यांच्या नावावर आहे.

पुढील बातम्या