
T20 विश्वचषक २०२२ मधील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये आज (१० नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता अॅडलेड ओव्हलवर खेळवला जाईल.
हा सामना जो संघ जिंकेल, तो १३ नोव्हेंबरला फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध जेतेपदाचा सामना खेळेल. अशा स्थितीत इंग्लिश संघाचा कर्णधार जोस बटलर आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा आपल्या दमदार प्लेइंग-११ सह मैदानात उतरू इच्छित आहेत.
या महत्त्वाच्या सामन्यासाठी रोहित शर्मा आपल्या प्लेइंग-११ मध्ये काही महत्त्वाचे बदल करू शकतो. चाहत्यांसाठी सर्वात मोठा सस्पेन्स हा आहे की दिनेश कार्तिक यष्टिरक्षक म्हणून खेळणार की ऋषभ पंत? तसेच, या सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विन खेळताना दिसणार की लेगस्पिनर युजवेंद्र चहलला संधी मिळू शकते, हे पाहावे लागेल.
वास्तविक, एक दिवस अगोदरच रोहितने सेमी फायनलमध्ये पंतला खेळवण्याचे संकेत दिले होते. भारतीय संघ ग्रुप स्टेजमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. यामध्ये कार्तिकच्या जागी पंतला संधी देण्यात आली होती. अशा परिस्थितीत रोहित आता पंतला कायम ठेवण्याच्या मूडमध्ये दिसत आहे.
हा सामना अॅडलेडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. फिरकीपटूंना येथे थोडी मदत मिळते. ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अॅडम झाम्पाने या मैदानावर T20 मध्ये सर्वाधिक ८ विकेट्स घेतल्या आहेत. अशा स्थितीत खेळपट्टी पाहता ऑफस्पिनर अश्विनच्या जागी लेगस्पिनर युझवेंद्र चहलला संधी मिळू शकते, असे दिसते आहे. तसेच, प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही उपांत्य फेरीतील खेळपट्टीच्या स्थितीनुसार खेळाडूंना प्लेइंग-११ मध्ये संधी मिळेल, असे संकेत दिले होते.
भारत-इंग्लंड सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग-11
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक/ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर अश्विन/युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग.
इंग्लंड संघ: जॉस बटलर (कॅण्ड विकेट), अॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान/फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद
संबंधित बातम्या
