मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Stuart Broad Record: इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडची कमाल, ग्लेन मॅकग्राला मागं टाकून रचला इतिहास

Stuart Broad Record: इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडची कमाल, ग्लेन मॅकग्राला मागं टाकून रचला इतिहास

Sep 11, 2022, 08:23 PM IST

    • England Vs South Africa Test Stuart Broad Record: ग्लेन मॅकग्राने १२४ कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला, तर स्टुअर्ट ब्रॉडला या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी १५९ कसोटी सामने खेळावे लागले. सध्या स्टुअर्ट ब्रॉड हा इंग्लंडकडून कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे.
Stuart Broad

England Vs South Africa Test Stuart Broad Record: ग्लेन मॅकग्राने १२४ कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला, तर स्टुअर्ट ब्रॉडला या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी १५९ कसोटी सामने खेळावे लागले. सध्या स्टुअर्ट ब्रॉड हा इंग्लंडकडून कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे.

    • England Vs South Africa Test Stuart Broad Record: ग्लेन मॅकग्राने १२४ कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला, तर स्टुअर्ट ब्रॉडला या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी १५९ कसोटी सामने खेळावे लागले. सध्या स्टुअर्ट ब्रॉड हा इंग्लंडकडून कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गज ग्लेन मॅकग्राला मागे टाकले आहे. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर ब्रॉडचा विक्रमी ५६४ वा बळी ठरला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

३६ वर्षीय ब्रॉडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात (ENG v SA कसोटी) ही कामगिरी केली. स्टुअर्ट ब्रॉडने एल्गरची शिकार करताच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहचला. या यादीत ८०० विकेट्स घेणारा श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन पहिल्या स्थानावर आहे. त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (७०८) आहे. तर तिसऱ्या स्थानावर ६६६ विकेट घेणारा इंग्लंडचा जेम्स अँडरसन आहे. भारताच्या अनिल कुंबळेचा चौथा नंबर लागतो. त्याने ६१९ विकेट्स घेतल्या आहेत. आता या यादीत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड देखील सामिल झाला आहे. तो आता ५६५ विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहे.

स्टुअर्ट ब्रॉडने १५९ कसोटीत ही कामगिरी केली

ग्लेन मॅकग्राने १२४ कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला, तर स्टुअर्ट ब्रॉडला या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी १५९ कसोटी सामने खेळावे लागले. सध्या स्टुअर्ट ब्रॉड हा इंग्लंडकडून कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. या यादीत अनुभवी जेम्स अँडरसन पहिल्या क्रमांकावर आहे.

सामना रंगतदार स्थितीत

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामना सध्या रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. इंग्लंडने पहिल्या डावात आफ्रिकेला ११८ गारद केले होते. मात्र आफ्रिकेनेही जोरदार कमबॅक करत इंग्लंडला १५८ धावांवर रोखले. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात फक्त ४० धावांचीच आघाडी घेता आली.

पुढील बातम्या